शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

भाविकांचे आकर्षण ठरतोय घोडा रथयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 22:08 IST

३९२ वर्र्षांच्या इतिहासाची दीर्घ परपंरा लाभलेल्या श्री बालाजी महाराज मंदिराची महाराष्ट्राचा तिरूपती बालाजी म्हणून ओळख आहे. रविवारी वसंत पंचमीला यात्रा सुरू होणार असून हजारो भाविक सहभागी होणार आहेत.

ठळक मुद्दे३९२ वर्षांची परपंरा : रविवारपासून यात्रेला सुरूवात

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : ३९२ वर्र्षांच्या इतिहासाची दीर्घ परपंरा लाभलेल्या श्री बालाजी महाराज मंदिराची महाराष्ट्राचा तिरूपती बालाजी म्हणून ओळख आहे. रविवारी वसंत पंचमीला यात्रा सुरू होणार असून हजारो भाविक सहभागी होणार आहेत.१७०४ मध्ये चिमूर येथील शेतकरी भिकुजी डाहुले पाटील यांनी जनावरांच्या गोठ्यासाठी जमीन खोदायला सुरुवात केली. एका जागेवर कुदळ मारताच धातुचा आवाज आला. तेव्हा पाटलांनी खोदकाम थांबविले. रात्री स्वप्न पडल्यानंतर खोदकामाला सुरूवात केली. खोदकामामध्ये एक सुंदर मूर्ती आढळली, अशी आख्यायिका पूर्वजांकडून सांगितली जाते. जानोजी भोसले यांनी पेशव्यांचे सरदार देवाजी पंत चोरघडे यांच्या विनंतीवरून १७५० मध्ये चिमूर येथे २०० एकर जमीन मंदिर उभारणीसाठी दान दिली. तटबंदीयुक्त असलेल्या मंदिराला उंच प्रवेशद्वार असुन त्यावर कोरीव काम केले आहे. लाकडी सभा मंडपात १२ खांब आहेत. हत्ती व वाघाचे चित्र कोरण्यात आले. चार दगडी खांब असलेला सभामंडप आहे. श्रीहरी बालाजी श्री मूर्ती आणि तिरूपती बालाजीची मूर्ती सारखीच आहे. मंदिराच्या आवारात एक गरूड खांब आहे. बाहेर काही पुजाऱ्यांच्या समाध्या बांधल्या आहेत. श्री बालाजी महाराज मंदिरात दरवर्षी माघ शुद्ध पंचमीला नवरात्र प्रारंभ होते. माघ त्रयोदशीला रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत भव्य लाकडी घोडा रथावरून श्रीहरी बालाजी महाराजाच्या प्रतिमेची शहरातून मिरवणुक काढली जाते. मिरवणुकीला ‘रातघोडा’ असे म्हणतात.रातघोडा उत्सवाला हजारो भाविक उपस्थित राहून दर्शन घेतात. तिसºया दिवशी दुपारी १२ ते ३ वाजता दरम्यान गोपालकाला करून मुख्य यात्रेचा समारोप करण्याची परंपरा आजही कायम आहे. मात्र घोडा रथयात्रा सलग १५ दिवस सुरू राहते. महाशिवरात्रीला यात्रेची सांगता होते. घोडा रथयात्रेत विविध प्रकारच्या मनोरंजनाचे खेळ लावल्या जातात. सर्कस, आकाश पाळणा, खेळण्यांची विविध दुकाने व मिना बाजारात मोठी गर्दी उसळते. यात्रेत सहभागी होणाºया भाविकांसाठी नगरपरिषद, स्वयंसेवी संघटना तसेच लोकप्रतिनिधींकडून सोईसुविधा पुरविल्या जातात.धार्मिक कार्यक्रमांची रेलचेलवसंत पंचमीला रविवारी रात्री ८ ते १० वाजता विनोदबुवा खोंड महाराज यांचे नारदीय कीर्तन होणार आहे. १७ फेब्रुवारीला रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत रातघोड्याची मिरवणूक निघेल. धार्मिक कार्यक्रमांची मोठी रेलचल राहणार आहे. २० फेब्रुवारीला दुपारी १२ ते ३ वाजतादरम्यान गोपालकाला कीर्तन झाल्यानंतर यात्रेची सांगता होईल. यात्रा महोत्सव महाशिरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे.