आदर्श शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:43 IST2021-02-23T04:43:41+5:302021-02-23T04:43:41+5:30

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून गंगाधर बनबरे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष दीपक खामनकर, दीपक जेऊरकर, दिनेश ...

Honoring ideal teachers and retired teachers | आदर्श शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार

आदर्श शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून गंगाधर बनबरे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष दीपक खामनकर, दीपक जेऊरकर, दिनेश पारखी, लक्ष्मण घुगुल, विजय मोरे, सारिका जाधव, स्वप्नील मोहुर्ले, संतोष रामगिरवार उपस्थित होते. यावेळी विशाल ढुमणे, शुभम खवसे, आदर्श उईके, अक्षय गावंडे, दीपक खेडेकर, अजय कन्नाके, विद्या मोहितकर यांची विविध क्षेत्रात निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यासोबत रामरतन चापले यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. दत्तात्रय मोरे, मधुकर बोबडे, बाबूराव पहानपटे हे शिक्षक सेवानिवृत्त झाले. त्यांचाही यावेळी गंगाधर बनबरे यांच्याहस्ते शाल, पुस्तक व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

संचालन मधुकर डांगे यांनी, जिजाऊ वंदना दिनेश पारखी व संभाजी साळवे यांनी संयुक्त गायिली, तर आभार संभाजी साळवे यांनी मानले.

यावेळी मधुकर मटाले, लक्ष्मण तुराणकर, दिलीप गिरसावळे, चंद्रकांत भोयर, राजू भोयर, विनोद बोबडे, देविका येमुलवार, सूरज भामरे उपस्थित होते.

Web Title: Honoring ideal teachers and retired teachers