महिला दिनानिमित्त आदर्श मातांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:31 IST2021-03-09T04:31:35+5:302021-03-09T04:31:35+5:30

यावेळी इयत्ता ८ ते १० च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी मुलींचा व महिलांचा आदर या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले ...

Honoring ideal mothers on the occasion of Women's Day | महिला दिनानिमित्त आदर्श मातांचा सन्मान

महिला दिनानिमित्त आदर्श मातांचा सन्मान

यावेळी इयत्ता ८ ते १० च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी मुलींचा व महिलांचा आदर या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता ५ ते ७ च्या मुला-मुलींसाठी गुड टच-बॅड टच, हार्मोन्समुळे मुलींमध्ये होणारे मानसिक व शारीरिक बदल, मुलींमध्ये वयानुरूप मासिक पाळीचे व्यवस्थापन याबाबत जागृती करण्यासाठी विद्यालयातील सहायक शिक्षिका संगिता बालमवार,सोनल उंबरकर, ज्योती मोहुर्ले यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक आर. बी. विधाते होते. याप्रसंगी नवनियुक्त सरपंच छाया घनश्याम मदनकर, वनिता विष्णूजी देशमुख, कल्पना शंकर मेश्राम या आदर्श मातांचा, महिलांचा शाल व श्रीफळ देऊन विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Web Title: Honoring ideal mothers on the occasion of Women's Day