आचार्य पदवी प्राप्त संचालकाचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2016 00:47 IST2016-09-08T00:47:39+5:302016-09-08T00:47:39+5:30
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रा. ललित का. मोटघरे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने...

आचार्य पदवी प्राप्त संचालकाचा सत्कार
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रा. ललित का. मोटघरे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने समाज विज्ञान शाखेतील अर्थशास्त्र विषयात त्यांनी सादर केलेल्या शोध प्रबंधाबद्दल आचार्य पदवी बहाल केली. याबद्दल मोटघरे यांचा बँकेच्या वतीने बुधवारी सत्कार करण्यात आला.
बँकेसाठी ही अभिमानास्पद बाब असून त्यांना मिळालेल्या यशाबद्दल बँकेच्या वतीने त्यांचा यथोचित गौरव व्हावा, या जाणिवेने बँकेच्या मुख्य कार्यालयातील स्व. श्रीराम जाणी सभागृहात बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष संजय सिंगम, संचालक, बँकेचे अधिकारी व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या निमित्त प्रा. मोटघरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. (शहर प्रतिनिधी)