महानगर पालिकेच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By Admin | Updated: July 20, 2016 00:42 IST2016-07-20T00:42:13+5:302016-07-20T00:42:13+5:30
शहर महानगरपालिकेच्या वतीने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

महानगर पालिकेच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
चंद्रपूर : शहर महानगरपालिकेच्या वतीने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन आ. नाना शामकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महापौर राखी कंचर्लावार होत्या तर प्रमुख अतिथी उपमहापौर वसंत देशमुख, स्थायी समिती सभापती संतोष लहामगे, सभागृह नेता रितेश तिवारी, आयुक्त संजय काकडे, महिला व बाल कल्याण समिती सभापती एस्तेर शिरवार, झोन क्र. १ चे सभापती देवानंद वाढई, झोन क्र. ३ चे सभापती मनोरंजन रॉय, उपायुक्त डॉ. विजय इंगोले तसेच नगरसेवक संजय वैद्य, अंजली धोटेकर, अनिल फुलझेले, रवी गुरुनुले, स्वरूपा आसरानी, विनयकुमार जोगेकर, अजय खंडेलवाल, रामटेके, वनश्री गेडाम, ललिता गराट, मडावी व उईके आदी उपस्थित होते.
संचालन स्वाती बेतावार व उमा कुकडपवार यांनी केले. आभार प्रदर्शन नागेश नीत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सैयद शहजाद पटेल, मेघश्याम दैवलकर, अरुण वलके, पानघाटे, आनंद गेडाम, भास्कर गेडाम व् सुनील पडगेलवार, लिपीक मनोज बद्दलवार, अनिल शेंडे यांनी परिश्रम घेतले. (स्थानिक प्रतिनिधी)