दिमाखदार सोहळ्यात होणार सखींचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 23:40 IST2017-12-07T23:40:06+5:302017-12-07T23:40:19+5:30
स्त्री शक्तीचे वेगवेगळ्या क्षेत्रात निरंतर उल्लेखनीय कार्य सुरुच असते. निश्चितच महिलांच्या सशक्तीकरणाला वाव देण्यासाठी व त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे.

दिमाखदार सोहळ्यात होणार सखींचा सन्मान
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : स्त्री शक्तीचे वेगवेगळ्या क्षेत्रात निरंतर उल्लेखनीय कार्य सुरुच असते. निश्चितच महिलांच्या सशक्तीकरणाला वाव देण्यासाठी व त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे. लोकमत सखी मंच व करण कोठारी ज्वेलर्स प्रस्तुत ‘लोकमत सखी सन्मान अवार्ड’ सोहळ रविवार दि. १० डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांच्या असाधारण कर्तृत्वाचा गौरव, प्रसिद्धीपासून दूर असलेल्या महिलांच्या कार्याला जगासमोर आणण्याचा प्रयत्न ‘लोकमत सखी सन्मान अवार्ड’च्या माध्यमातून केला जाणार आहे. हा अवार्ड वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य व कला, क्रीडा, उद्योगक व व्यवसाय आणि शौर्य या क्षेत्रात विभागून दिला जाणार आहेत. जीवनगौरव पूरस्कारही या सोहळ्याची उंची वाढविणार आहे.
या अवार्डसाठी विविध क्षेत्रातून अनेक प्रस्ताव आलेत. या सर्व महिलांनी या सोहळ्याला सहपरिवार उपस्थित राहायचे आहेत. प्रवेशिका लोकमत कार्यालयातून प्राप्त करावयाची आहे. जिल्हा इव्हेंट प्रमुख अमोल कडुकर(९२७०१३१५८०), जिल्हा सखी संयोजिका सोनम मडावी (९९७५६६६३५५) यांच्याशी संपर्क साधावा.