गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
By Admin | Updated: August 30, 2016 00:43 IST2016-08-30T00:43:46+5:302016-08-30T00:43:46+5:30
राजुरा तालुक्याच्या वेकोलि परिसरातील साखरी येथील विद्या शिक्षण प्रसारक मंडळ चुनाळा द्वारा संचालित प्रियदर्शिनी विद्यालयाच्या प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार...

गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
गं्रथालयाचे उद्घाटन : भारतीय कोयला मजदूर संघाचे आयोजन
सास्ती : राजुरा तालुक्याच्या वेकोलि परिसरातील साखरी येथील विद्या शिक्षण प्रसारक मंडळ चुनाळा द्वारा संचालित प्रियदर्शिनी विद्यालयाच्या प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला.
राजुरा तालुक्यातील वेकोलि परिसरातील साखरी येथील प्रियदर्शिनी प्रांगणात भारतीय कोयला खदान मजदूर संघातर्फे पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रियदर्शिनी विद्यालयाच्या वतीने प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय ग्रंथालयाच्या उद्घाटन समारंभाचेही आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राजुराचे आमदार अॅड. संजय धोटे, विद्या शिक्षण प्रसारक मंडळ चुनाळाचे अध्यक्ष तथा राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर, भारतीय कोयला खदान मजदूर संघ वर्धा व्हॅलीचे अध्यक्ष दिलीप सातपुते, अनिल बंडीवार, महामंत्री रमेश बल्लेवार, साखरीचे सरपंच भाऊजी कोडापे, उपसरपंच अमोल घटे, भारतीय कोयला मजदूर संघाचे महिला प्रतिनिधी आशालता सिन्हा उपस्थित होत्या.
यावेळी प्राविण्यप्राप्त विद्यार्थी स्वप्निल निवलकर, शालु काटवले, दिपक आस्वले, रूपाली उरकुडे, सोनाली गालफाडे, उषा बोरकुटे या विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह व पुस्तक देऊन मंत्री महोदयाच्या हस्ते गौरव करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टीकता यावे त्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्याच्या दृष्टीने वाचन आवश्यक आहे. त्याकरिता त्यांचा चांगली पुस्तके मिळावी, याकरिता शाळेच्या वतीने व लोकसहभागातून ग्रंथालय सुरू केले असून ग्रंथालयाचे उद्घाटनह पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष केशवराव ठाकरे, विद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष बाबाराव वाभिटकर, सचिव मनोज पावडे, शाळेचे मुख्याध्यापक मोरेश्वर थिपे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, कामगार, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)