गृहरक्षक हे पोलिसांचेच अंग
By Admin | Updated: December 16, 2015 01:24 IST2015-12-16T01:24:18+5:302015-12-16T01:24:18+5:30
होमगार्डस् संघटना एक सेवाभावी संघटना असून विविध कर्तव्य बजावित असतात.

गृहरक्षक हे पोलिसांचेच अंग
संदीप दिवाण : राज्य होमगार्डस् व नागरी संरक्षण दलाचा वर्धापन दिन
चंद्रपूर : होमगार्डस् संघटना एक सेवाभावी संघटना असून विविध कर्तव्य बजावित असतात. आजच्या महागाईच्या काळात अल्पशा मानधनावर सुद्धा होमगार्ड पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून आपले कर्तव्य चोखपणे बजावित आहे. होमगार्डनी पोलीस भरतीमध्ये असलेल्या पाच टक्के आरक्षणाचा लाभ घ्यावा. होमगार्डनी घेतलेल्या प्रशिक्षणाचा फायदा त्यांना पोलीस प्रशिक्षण घेताना नक्की होतो. ते पोलिसांचेच अंग असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले.
चंद्रपूर जिल्हा होमगार्डस्च्या वतीने पुरुष होमगार्डचे उजळणी प्रशिक्षण शिबिर व महाराष्ट्र राज्य होमगार्डस व नागरी संरक्षण दलाचा वर्धापन दिन समारंभ रविवारी जिल्हा प्रशिक्षण केंद्र महेशनगर तुकूम चंद्रपूरच्या पटांगणात घेण्यात आला. याप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद आर. गिरी यांनी केले. यावेळी केंद्रनायक प्रमोद रामेरवार, समादेशक अधिकारी गजानन पांडे तसेच कार्यालयातील वेतनीय कर्मचारी, पथक, मानसेवी अधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)