सोनुर्ली येथील पकडीगुड्डम सिंचन प्रकल्पाच्या सदनिका बेवारस
By Admin | Updated: August 21, 2015 01:20 IST2015-08-21T01:20:56+5:302015-08-21T01:20:56+5:30
कोरपना तालुक्यातील पकडीगुड्डम सिंचन प्रकल्पासाठी २२ वर्षांपूर्वी सोनुर्ली (वनसडी) येथे सदानिका बांधण्यात आल्या.

सोनुर्ली येथील पकडीगुड्डम सिंचन प्रकल्पाच्या सदनिका बेवारस
कान्हाळगाव (कोरपना): कोरपना तालुक्यातील पकडीगुड्डम सिंचन प्रकल्पासाठी २२ वर्षांपूर्वी सोनुर्ली (वनसडी) येथे सदानिका बांधण्यात आल्या. परंतु निर्मितीपासूनच कुठलाच कर्मचारी येथे वास्तव्यास न आल्याने सदनिकांची दूरवस्था झाली आहे.
प्रकल्पांच्या देखभाल व देखरेखीसाठी या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून सदनिका तर तयार करण्यात आल्या. मात्र हा प्रकल्प व सदनिका अधिकारी व लोकप्रतिनिधीच्या उदासिनतेमुळे कुचकामी ठरले आहे. येथे सदनिका बांधून तयार असल्यातरी येथील प्रकल्पाचे कार्यालय गडचांदूूर येथे आहे. १८ किलोमीटर अंतरावरुन प्रकल्पाची सुरक्षा व देखभाल केली जात आहे. प्रकल्पासाठी बांधण्यात आलेल्या सदनिकांची आजमितीला अत्यंत दैनावस्था झाली आहे. सदनिकांची नासधूस झाली असून दार, खिडक्या पुर्णता मोडकळीस आल्या आहे. सभोवताल असलेले तारेचे कुंपणही चोरट्यांनी लंपास केले आहे. याकडे लक्ष देण्यासाठी मात्र अधिकाऱ्यांना वेळ नाही. प्रकल्पही नाममात्र अवस्थेत उरला असून याचा हेतु पुर्णता फसला आहे. याकडे सिंचाई विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर)