मागण्या प्रलंबित : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद नर्सेस संघटनेतर्फे येथील जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी १२ व १४ वर्षांची कालबद्ध पदोन्नती द्यावी, १०, २०, ३० कालबध्द पदोन्नती मंजूर करण्यात यावी, एलएचव्ही पदावर पदोन्नती द्यावी, भविष्य निर्वाह निधीची रक्कम अर्ज केल्यापासून एक महिन्याच्या आत देण्यात यावी, सेवा पुस्तके अद्ययावत करावी, सहायक परिचारिका, एएनएम जॉबचार्टनुसार कामे द्यावी, प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त असलेले आरोग्य सहायक (स्त्री) पद भरावे, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर एक डाटा एंट्री ऑपरेटर देण्यात यावा, यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात संघटनेच्या अध्यक्ष इंदिरा लांडे, जयंती रामटेके, प्रतिभा नगराळे, ज्योती गेडाम, कीर्ती कुळमेथे, स्मिता आबोजवार, छाया पारशिवे, छाया सोनटक्के, गीता खामनकर, शारदा खोब्रागडे, काजल ङ्कुलझेले, मनोरमा चौधरी, सुनीता घडसे, रंजना कोहपरे यांच्यासह नर्सेस संघटनेच्या सदस्य उपस्थित होत्या.