शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात अंगणवाडी महिलांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:28 IST2021-01-20T04:28:11+5:302021-01-20T04:28:11+5:30
चंद्रपूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी अंगणवाडी महिला तसेच जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वात सोमवारी जिल्हाधिकारी ...

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात अंगणवाडी महिलांचे धरणे
चंद्रपूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी अंगणवाडी महिला तसेच जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाने पारित केलेल्या शेतकरी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांनी मागील अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. मात्र अद्यापही तोडगा निघाला नाही. आंदोलनाच्या समर्थनात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी विरोधी कायदे मागे घ्या, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, कामगार विरोधी कायदे मागे घ्या, अशा घोषणा देऊन लक्ष वेधण्यात आले. यावेळी किसान सभेचे नेते अरुण लाटकर यांची उपस्थिती होती. यावेळी अरुण लाटकर, प्रा. दहीवडे यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. संचालन प्रमोद गोडघाटे तर आभार राजेश पिंजरकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी राधा सुंकरवार, पवित्रा ताकसांडे, वर्षा तिजारे, वंदना मुळे, अल्का नळे, सारिका कामतवार, विद्या निब्रड, विठोबा एकोनकर, जयसिंग कोसे, पुरुषोत्तम आदे, वामन मानकर, सुधाकर ताजणे, सिन्नू बोच्चा, कुणालाल घरत आदी उपस्थित होते.