प्रलंबित मागण्यांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:19 IST2021-07-08T04:19:07+5:302021-07-08T04:19:07+5:30

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले. चंद्रपूर येथील आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य ...

To hold Vidarbha Secondary Teachers Association for pending demands | प्रलंबित मागण्यांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे

प्रलंबित मागण्यांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले. चंद्रपूर येथील आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य शिक्षक महामंडळाचे सरकार्यवाह जगदीश जुनघरी, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष केशव ठाकरे, सरकार्यवाह श्रीहरी शेंडे यांनी केले. प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ यावेळी शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला.

आंदोलनात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी लक्ष्मणराव धोबे, दिगंबर कुरेकर, वसुधा रायपुरे, मंजुषा घागी, प्रमोद कोंडलकर यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. प्रलंबित मागण्यांची पूर्तता लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

२००५ नंतर नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली अंशतः निवृत्ती वेतन योजना रद्द करून कर्मचाऱ्यांना १९८२ ची कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात यावी, शासननिर्णय फेब्रुवारी २०२१ अंतर्गत अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांच्या व वर्गतुकड्यांची त्रुटींची पूर्तता करून अनुदानास पात्र घोषित करावे. राज्यातील अघोषित शाळा व नैसर्गिक वाढीव तुकड्यांना अनुदान घोषित करून निधीची उपलब्धता करून देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांचाही समावेश होता.

याप्रसंगी जिल्हा परिषद कार्यालयासमोर निदर्शने करून शासनाचा निषेध करण्यात आला व त्यानंतर शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

Web Title: To hold Vidarbha Secondary Teachers Association for pending demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.