हिरकणीच्या भोजन सेवेला शंभर दिवस पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:30 IST2021-09-26T04:30:17+5:302021-09-26T04:30:17+5:30

फोटो बल्लारपूर : महिलांची सेवाभावी संस्था येथील रणरागिणी हिरकणी फाऊंडेशनचे वतीने गरजूंना दहा रुपयांत भोजन सेवा तीन महिन्यांपूर्वी स्थानिक ...

Hirkani's food service is completed in one hundred days | हिरकणीच्या भोजन सेवेला शंभर दिवस पूर्ण

हिरकणीच्या भोजन सेवेला शंभर दिवस पूर्ण

फोटो

बल्लारपूर : महिलांची सेवाभावी संस्था येथील रणरागिणी हिरकणी फाऊंडेशनचे वतीने गरजूंना दहा रुपयांत भोजन सेवा तीन महिन्यांपूर्वी स्थानिक पोलीस ठाण्यासमोर वर्दळीच्या ठिकाणी सुरू केली. या सेवेला शंभर दिवस पूर्ण झाल्या निमित्ताने छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून या काळात सेवा कार्यात सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.

ही सेवा अशीच अविरत सुरू ठेवण्याचा संकल्प हिरकणीच्या सदस्यांनी घेतला. शंभर दिवसानिमित्त भोजनात गोड पदार्थही देण्यात आले. या कार्यक्रमात अतिथी म्हणून घनश्याम मुलचंदानी, भगवानदास गिद्वावाणी, अब्दुल करीम, भास्कर माकोडे, पूजा पंजाबी, मुस्कान मोटवाणी, सुशिला गुलानी, प्रकाश वर्मा, पल्लवी सरनाईक, हिरकणी फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. मनीषा कल्लूलवार उपस्थित होते.

250921\1645-img-20210925-wa0007.jpg

हिरकणी च्या दहा रुपयात भोजन सेवेला शंभर दिवस पूर्ण सेवा अविरत चालू ठेवण्याचा संकल्प

Web Title: Hirkani's food service is completed in one hundred days