जुन्याच दराने गृहकर आकारणी करा

By Admin | Updated: May 15, 2016 00:44 IST2016-05-15T00:44:12+5:302016-05-15T00:44:12+5:30

चंद्रपूर शहर महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर गृहकराचे निर्धारण करण्यात आले असल्याने ...

Hire the house at the old rate | जुन्याच दराने गृहकर आकारणी करा

जुन्याच दराने गृहकर आकारणी करा

चंद्रपुरात बैठक : मनपा आयुक्तांना हंसराज अहीर यांचे निर्देश
चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर गृहकराचे निर्धारण करण्यात आले असल्याने गृहकर वाढीचा प्रस्ताव हा महानगरातील नागरिकांवर अन्यायकारक आहे. या प्रस्तावावर कार्यान्वयन न करता विद्यमान कालावधीत जो कर आकारण्यात येत आहे, तोच गृहकर २०१७ पर्यंत लागू करण्याचे निर्देश केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चंद्रपूर महानगर पालिका प्रशासनाला दिले आहेत.
स्थानिक विश्रामगृहात शुक्रवारी केंद्रीय राज्यमंत्री अहीर यांनी चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या महापौर, आयुक्त व अन्य खात्याच्या प्रमुखांची बैठक बोलावून चर्चा केली व बैठकीत निर्देश दिले. महापौर, उपमहापौर, आयुक्त व अन्य अधिकाऱ्यांना बोलावून घेतलेल्या बैठकीत निर्देश दिल्याने नागरिकांचा गृहकरासंबंधीचा प्रश्न सुटणार आहे. या बैठकीला महापौर राखीताई कंचर्लावार, उपमहापौर वसंत देशमुख, मनपा स्थायी समिती सभापती संतोष लहामगे, आयुक्त सुधीर शंभरकर, भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, भाजपा गटनेते अनिल सफुलझेले, नगरसेवक धनंजय हूड, भाजपा जिल्हा सचिव राहुल सराफ आदींची या बैठकीस प्रामुख्याने उपस्थिती होती.
सन २०१२ ते २०१७ पर्यंत निर्धारित केलेला गृहकर लागू ठेवणे क्रमप्राप्त असताना त्यात वाढ करण्याचे हल्लीच प्रयोजन नव्हते, अशी भुमिका ना. अहीर यांनी बैठकीत घेतली. चटई क्षेत्र वाढले नसताना किंवा घराच्या बांधकामात वाढ झाली नसतानाही घरटॅक्स वाढीचा निर्णय अयोग्य होता. त्यामुळे हा गृहकर पूर्वीच्याच दराने भरण्याची मुभा नागरिकांना व वाणिज्यिक प्रतिष्ठानांना दिली जावी, असे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले. ज्यांना पूर्वीचा घर टॅक्स लागू झाल्यानंतर नव्याने बांधकाम केले किंवा ज्यांच्या बांधकामाचे क्षेत्रफळ वाढले असेल तर अशांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना केली. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Hire the house at the old rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.