हिंदू कोडबिल हा स्त्रियांचा अलंकार - वंदना जांभूळकर
By Admin | Updated: April 24, 2015 01:03 IST2015-04-24T01:03:20+5:302015-04-24T01:03:20+5:30
हिंदू कोडबील हे स्त्रियांसाठी आवश्यक होते, परंतु मनुवाद्यांनी बहुजनांच्या स्त्रियांना हे कोडबिल अंमलात येऊ दिले नाही व विरोध करण्यात आला, ...

हिंदू कोडबिल हा स्त्रियांचा अलंकार - वंदना जांभूळकर
भद्रावती : हिंदू कोडबील हे स्त्रियांसाठी आवश्यक होते, परंतु मनुवाद्यांनी बहुजनांच्या स्त्रियांना हे कोडबिल अंमलात येऊ दिले नाही व विरोध करण्यात आला, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या वंदना जांभूळकर यांनी दिली.
जगदगुरू तुकोबा राय वारकरी संप्रदाय तसेच गुरुदेव सेवा मंडळ घोनाड कोच्ची यांच्या सौजन्याने हिंदू कोडबील या विषयावर त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. आसावरी देवतळे यांनी शुद्ध हवा, पाणी, आहार व शिक्षण या विषयावर बोलताना निसर्गाचे संतुलन राखण्याकरिता प्रत्येकाने प्रयत्न करावा तरच आपल्या जीवनात शुद्ध हवा, पाणी, आहार व शिक्षण मिळू शकेल असे सांगितले.
भोसले कॉलेज मोरवाचे प्राध्यापक महादेव ढुमने म्हणाले, गौतम बुद्ध, महात्मा फुले डॉ.आंबेडकर यांच्या आदर्शाचे विचार आपल्या अंगी उतरवून नवीन समाज व्यवस्था निर्माण करायला पाहिजे. तरच बहुजनांचा उद्धार होऊ शकतो, असे सांगितले.
श्रीधर मालेकर यांनीसुद्धा कार्यक्रमाच्या निमित्याने प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला नामदेव वांढरे, डॉ. आसावरी देवतळे, श्रीधर मालेकर, महादेवराव ढुमने, वंदना जांभूळकर उपस्थित होते. नागरिकांची मोठी उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)