रस्त्यासाठी डोनीतील ग्रामस्थांची पदयात्रा

By Admin | Updated: May 10, 2014 00:09 IST2014-05-10T00:09:35+5:302014-05-10T00:09:35+5:30

चंद्रपूर तालुक्यातील घनदाट जंगलातील आदिवासी वस्ती असलेल्या डोंनी या गावात जाण्यासाठी रस्ता तयार होत असताना वनविभागाने अडविले.

Hiking the road for Doni villagers | रस्त्यासाठी डोनीतील ग्रामस्थांची पदयात्रा

रस्त्यासाठी डोनीतील ग्रामस्थांची पदयात्रा

चंद्रपूर : चंद्रपूर तालुक्यातील घनदाट जंगलातील आदिवासी वस्ती असलेल्या डोंनी या गावात जाण्यासाठी रस्ता तयार होत असताना वनविभागाने अडविले. त्यामुळे याविरोधात शेकडो गावकर्‍यांनी डोनी ते चंद्रपूर अशी पदयात्रा काढून वनविभागाचे मागणीकडे लक्ष वेधले. चंद्रपूर तालुक्यात शेवटच्या टोकावर जंगलातील वनविभागाच्या बफर क्षेत्रात डोनी हे आदिवासी वस्तीचे गाव आहे. या गावात जाण्यासाठी जानाळापासून १२ किमी अंतर हा खडीकरणाचा रस्ता आहे. खडीकरण होऊन बरेच वर्ष झाल्यामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या गावात जाण्यासाठी एस.टी. महामंडळाची बस सकाळी व सायंकाळी जाते. परंतु रस्ता खराब असल्यामुळे अनेकदा बस जातच नाही. आपल्या सोयीसाठी हा एकमेव रस्ता असल्यामुळे अनेकदा गावकर्‍यांनी श्रमदान करुन रस्ता दुरुस्त केलेला आहे. गावकर्‍यांच्या अनेकदा केलेल्या मागणीनुसार जिल्हा परिषदेमार्फत रस्त्याचे काम सुरु करण्यात आले व रस्ता ७०० मीटर करण्यात आला. त्यानंतर वनविभागाने या रस्त्याचे काम अडविले. गावात आदिवासींना रोजगार नाही, आरोग्याच्या सुविधा नाही, स्वच्छ पाणी नाही. आता होणारा रस्ताही अडविल्याने गावकरी संतप्त झाले. श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात डोनी ते बफर वनविभाग चंद्रपूर अशी ५३ कि.मी. पदयात्रा शेकडो महिला- पुरुषांनी काढली. यावेळी उपवनसंरक्षक नरवडे यांना निवेदन देण्यात आले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Hiking the road for Doni villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.