महिला क्रिकेट स्पर्धेत हायवे संघ अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:31 IST2021-03-09T04:31:33+5:302021-03-09T04:31:33+5:30

बल्लारपूर : महिला दिनानिमित्त येथील हेल्पिंग हँड्स बल्लारपूर हिरकणी या सेवाभावी संघटनेच्या वतीने येथे आयोजित महिला क्रिकेट स्पर्धेत हायवे ...

Highway team wins women's cricket tournament | महिला क्रिकेट स्पर्धेत हायवे संघ अजिंक्य

महिला क्रिकेट स्पर्धेत हायवे संघ अजिंक्य

बल्लारपूर : महिला दिनानिमित्त येथील हेल्पिंग हँड्स बल्लारपूर हिरकणी या सेवाभावी संघटनेच्या वतीने येथे आयोजित महिला क्रिकेट स्पर्धेत हायवे संघ अजिंक्य तर सिंगल संघ हा संघ उपविजेता ठरला.

येथील माऊंट विज्ञान महाविद्यालयाचे पटांगणावर रविवारी पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण चार संघ खेळलेत. डॉ. श्वेता मानवटकर, डॉ. क्षमा बोधे, डॉ. ममता लोहे, सिमरन मंगानी, प्रिती निंदेकर, श्रध्दा मेहता यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते झाले. नगराध्यक्ष हरिश शर्मा, शुभांगी शर्मा, कृतिका सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती. बक्षीस वितरण माजी नगराध्यक्ष लखनसिंह चंदेल, न.प.चे मुख्याधिकारी विजय सरनाईक, डॉ.मंगेश गुलवाडे, ॲड. मेघा रामगुंडे, रामनारायण खंडेलवाल, प्रवीण विघ्नेश्वर, प्रकाश दोतपल्ली, अहमद यांचे हस्ते झाले. कोविड योद्ध्यांचा सत्कारही करण्यात आला. स्पर्धा हेल्पिंग हँड्स हिरकणीच्या अध्यक्ष डॉ. मंजूषा कल्लुरवार यांच्या नेतॄत्वात प्रोजेक्ट डायरेक्टर सिमरन सय्यद, रोहिणी नंदिगमवार, अमॄता कल्लुरवार, किरण शर्मा, वनिता रायपुरे, कमला बदावत, हर्षिता कुकरेजा, योजना गंगाशेट्टीवार, डॉ. सपना जैन, सीमा भास्करवार, ललिता हलदरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

Web Title: Highway team wins women's cricket tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.