महानगरपालिकेतर्फे हायमास्टचे लोकार्पण

By Admin | Updated: July 20, 2015 00:46 IST2015-07-20T00:46:55+5:302015-07-20T00:46:55+5:30

चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे अष्टभुजा प्रभाग क्रं. १८ येथील गौसीया मस्जीदजवळ व डब्ल्यू.सी.एल. कॅन्टींगजवळ ...

The HighMest Launches by Municipal Corporation | महानगरपालिकेतर्फे हायमास्टचे लोकार्पण

महानगरपालिकेतर्फे हायमास्टचे लोकार्पण

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे अष्टभुजा प्रभाग क्रं. १८ येथील गौसीया मस्जीदजवळ व डब्ल्यू.सी.एल. कॅन्टींगजवळ रमजान ईदचे पूर्वसंध्येला महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका कार्यक्रमात दोन हायमास्टचे लोकार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्थायी समितीचे सभापती संतोष लहामगे, माजी सभापती रितेश तिवारी, सभापती सचिन भोयर, महिला बालकल्याण सभापती एस्तेर शिरवार उपस्थित होते. सदर परिसर हा दाट लोकवस्तीचा परिसर असल्यामुळे येथे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आवागमन सुरू असते. परंतु या परिसरातील बराचशा भागात स्ट्रिट लाईटची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अंधाराचा त्रास सहन करावा लागत होता. या सर्व बाबींचा पाठपुरावा संबंधी नगरसेवक व प्रभागातील नागरिकांमार्फत महापौर व स्थायी समिती सभापती यांना करण्यात आलेला होता. परिसरातील नागरिकांचा त्रास लक्षात घेता महापौर, स्थायी समिती सभापती यांनी तात्काळ दोन हायमास्ट सदर परिसरात मंजूर करून येथील नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. या लोकार्पण सोहळ्यात नगरसेवक दुर्गेश कोडाम, राजेश रेवेल्लीवार, राजेश अडूर, नगरसेविका सुभेदिया कश्यप उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The HighMest Launches by Municipal Corporation