‘त्या’ आगीची उच्चस्तरीय चौकशी करा : कॉंग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:34 IST2021-09-09T04:34:23+5:302021-09-09T04:34:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क घुग्घुस : सोमवारी पहाटे येथील नगर परिषदेच्या जुन्या इमारतीतील रेकाॅर्ड व साहित्य असलेल्या दोन खोल्यांना आग ...

High-level inquiry into 'that' fire: Congress demand | ‘त्या’ आगीची उच्चस्तरीय चौकशी करा : कॉंग्रेसची मागणी

‘त्या’ आगीची उच्चस्तरीय चौकशी करा : कॉंग्रेसची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

घुग्घुस : सोमवारी पहाटे येथील नगर परिषदेच्या जुन्या इमारतीतील रेकाॅर्ड व साहित्य असलेल्या दोन खोल्यांना आग लागली. या आगीत ग्रामपंचायतीचे जुने रेकाॅर्ड व विजेचे साहित्य जळले. या आगीची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन कॉंग्रेसने मुख्याधिकारी आर्शिया जुही यांना दिले.

मागील पंचवार्षिकमधील भ्रष्टाचाराच्या तक्रारीने नेहमी ग्रामपंचायत चर्चेत राहिली. नवीन वर्षात नगर परिषद झाली असली, तरी अजूनही तो विषय गाजत आहे. दोन दिवसांपासून पाऊस असताना सोमवारी पहाटे महत्त्वाची कागदपत्रे असलेल्या खोलीला आग लागली व कागदपत्रे जळली. ही घटना संशयास्पद असून, या आगीची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजू रेड्डी, किसान सेल कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, जिल्हा अनुसूचित जातीचे जिल्हाध्यक्ष पावन आगदारी, कामगार नेते सय्यद अनवर यांनी केली आहे.

Web Title: High-level inquiry into 'that' fire: Congress demand