मुलाच्या लग्नात दिला आदिवासी विद्यार्थ्याला मदतीचा हात
By Admin | Updated: June 17, 2017 00:34 IST2017-06-17T00:34:30+5:302017-06-17T00:34:30+5:30
विवाह सोहळा म्हणजे पैशाची उधळपट्टी आली. डीजे, बँडच्या तालावर थिरकणारी तरुणाई यातून वऱ्हाडी मंडळीला ताटकळत वर मंडपी येण्याची पहावी लागणारी वाट.

मुलाच्या लग्नात दिला आदिवासी विद्यार्थ्याला मदतीचा हात
नवा आदर्श : लग्न वेळेवर लावल्याने वर-वधू पित्याचा सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : विवाह सोहळा म्हणजे पैशाची उधळपट्टी आली. डीजे, बँडच्या तालावर थिरकणारी तरुणाई यातून वऱ्हाडी मंडळीला ताटकळत वर मंडपी येण्याची पहावी लागणारी वाट. यामुळे लहान्यांपासून ज्येष्ठापर्यंत सर्वांनाच त्रास सहन करवा लागत असतो. परंतु साखरी येथील काशिनाथ गोरे यांच्या अंकुश या मुलाचा विवाह सोहळा पोंभूर्णा तालुक्यातील चंपतराव ठवस यांची मुलगी शिल्पा हिच्याशी नुकताच पार पडला. हा विवाह सोहळा अगदी वेळेवर लावला. तसेच नवेगाव येथील घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असलेल्या आदिवासी बंडू सलामे या मुलाला अकरा हजार रुपये देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला.
एरवी विवाह सोहळा असला की वर पित्यामध्ये असलेला आनंद वेगळाच असतो. त्यात तो वेळेचे भान विसरून वरातीमध्ये दंग असतात. डिजे व बँडच्या धुंदीची नशा त्यांच्या डोक्यात असतात. त्यामुळे वेळेचे भान विसरून तोही तरुणाईमध्ये थिरकताना दिसून येते. परंतु समाजात अशी फार कमी मंडळी आहे की ते वेळेचे भान ठेवून सोहळ्याप्रसंगी येणाऱ्या मंडळींना त्याचा त्रास होऊ नये म्हणून लग्न सोहळा वेळेवर पार पाडत असतो. हे येथील काशिनाथ गोरे यांनी दाखवून दिले.
याप्रसंगी उपस्थित असलेले राजुऱ्याचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी लग्न सोहळा वेळेवर लावल्याने वर पित्याचे व वधु पित्याचे शाल व पुष्पगुच्छ देवन सत्कार केला. यावेळी विलासराव बोंगीवार माजी नगराध्यक्ष राजुरा, बाबुराव मडावी, केशवराव ठाकरे यांची उपस्थिती होती.
घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्यामुळे पुढील शिक्षण घेण्यास असमर्थ असलेला नवेगाव येथील बंडू सलामे या आदिवासी समाजातील युवकाला वराचे पिता काशिनाथ गोरे यांनी विवाह सोहळ्यात आणून त्याला माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते ११ हजार रुपयांचा धनादेश दिला. त्यांच्या या समाजपयोगी कार्याचे विवाहाला जमलेल्या मंडळींसह सर्वत्र कौतुक होत आहे.
त्यांचा हा आदर्श समाजातील इतर मंडळींनी घेतल्यास गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता मदत होणार असल्याचे सर्वत्र बोलल्याही जात होते.