वैशालीच्या उपचाराकरिता सरसावले मदतीचे हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 22:30 IST2018-11-27T22:29:43+5:302018-11-27T22:30:06+5:30
भिसी येथील वैशाली खटूजी शिवरकर या युवतीला हृदयविकाराचा दुर्धर आजार आहे. डॉक्टरांनी तिला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. पण घरची परिस्थिती हलाखिची असल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या.

वैशालीच्या उपचाराकरिता सरसावले मदतीचे हात
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : भिसी येथील वैशाली खटूजी शिवरकर या युवतीला हृदयविकाराचा दुर्धर आजार आहे. डॉक्टरांनी तिला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. पण घरची परिस्थिती हलाखिची असल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. दरम्यान ‘लोकमत’ने सोमवारी वृत्त प्रकाशित करून वैशाली व्यथा मांडली. या वृत्ताची दखल घेत भिसी येथील धनराज मुंगले यांनी वैशालीच्या उपचाराचा खर्च उचलला. नागपूर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची माहिती वैशालीच्या घरी भेट देऊन दिली. यावेळी तुळशीदास बन्सोड व अन्य मान्यवर उपस्थित होते.