हुंडा प्रतिबंधासाठी सल्लागारांची घेणार मदत
By Admin | Updated: August 14, 2016 00:26 IST2016-08-14T00:26:24+5:302016-08-14T00:26:24+5:30
समाजात कायदा असतानाही विवाहित महिलांचा हुंड्यासाठी बळी जात आहे.

हुंडा प्रतिबंधासाठी सल्लागारांची घेणार मदत
प्रस्ताव मागविले : महिलांच्या शोषणाविरोधात काम करणार
चंद्रपूर : समाजात कायदा असतानाही विवाहित महिलांचा हुंड्यासाठी बळी जात आहे. हुंडा पद्धत नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने सल्लागार मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्याकरिता प्रस्ताव मागितले आहेत.
हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सल्लागार मंडल गठीत करण्यासाठी नामनिर्देशने मागविण्यात येत आहेत. जिल्हा सल्लागार मंडळाच्या सदस्यांच्या नामनिर्देशनासाठीची काही निकष ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार, हुंडा प्रतिबंधक अधिनियम १९६१ च्या कलम ८ ब (४) च्या तरतुदीनुसार प्रत्येक जिल्ह्यात गठीत करावयाच्या सल्लागार मंडळातील सदस्य म्हणून एखाद्या व्यक्तीचे नामनिर्देशन, ज्यांच्या छायी क्षमता, सचोटी आणि प्रतिष्ठा असेल आणि ज्यांना महिलांच्या शोषणासंबंधीच्या समस्या सोडविण्याबाबतचे पुरेसे ज्ञान व अनुभव असेल, ज्याचे वय त्यांच्या नामनिर्देशनाच्या वेळी ३५ वर्षांपेक्षा कमी नसून ६५ वर्षांपेक्षा अधिक नसेल अशा व्यक्तीमधून करण्यात येईल. परंतु ज्यांना हुंडा प्रतिबंधक अधिनियम, महिलांच्या शोषणासंबंधीच्या समस्या सोडविणे, महिलांच्या संबधातील कायदे, त्यांचा विकास व पुनर्वसन याबाबतचे ज्ञान व त्यासंबंधातील कार्याची तीन वर्षापेक्षा कमी नसेल अशा व्यक्तीना नामनिर्देशनात प्राधान्य देण्यात येईल. (प्रतिनिधी)
१९ आॅगस्टपर्यंत प्रस्तावासाठी मुदत
नामनिर्देशन करीत असलेली व्यक्ती ही त्या जिल्ह्यातील रहिवाशी असणे आवश्यक असून नामनिर्देशन सादर करण्यासाठी विहित नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातून प्राप्त करून घ्यावा. नामांकन १९ आॅगस्ट २०१६ ला सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. त्यानंतर आलेल्या नामांकन स्वीकारले जाणार असल्याचे जिल्हा महिला बाल विकास बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.