शेतकऱ्यांना मदत करा, अन्यथा आंदोलन

By Admin | Updated: June 19, 2017 00:53 IST2017-06-19T00:53:51+5:302017-06-19T00:53:51+5:30

सरकार मोठ-मोठ्या घोषणा करते, पण अंमलबजावणी नाही, सध्याचे सरकार घोषणा करण्यात माहीर आहे.

Help the farmers, otherwise the agitation | शेतकऱ्यांना मदत करा, अन्यथा आंदोलन

शेतकऱ्यांना मदत करा, अन्यथा आंदोलन

जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन : शिवसेनेचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सरकार मोठ-मोठ्या घोषणा करते, पण अंमलबजावणी नाही, सध्याचे सरकार घोषणा करण्यात माहीर आहे. सरकारने घोषणा करून सुध्दा शेतकऱ्याला अजूनपर्यंत १०हजार रूपये कर्ज देण्यात आले नाही. त्यामुळे या सरकारने जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाची थट्टा चालविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित मदत करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतिने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.
आजचा शेतकरी या सरकारच्या पोकळ घोषणामुळे त्रस्त झालेला आहे यातच भारतीय चलनातील नोटा बंद होऊन जवळपास सहा ते सात महिने होऊन गेले, परंतु बँक किवा ए.टी.एम च्या स्थितीत बदल झालेला नाही, ए.टी.एम मध्ये पैसे नाही, ए.टी.एम समोर तसेच बँकेच्या समोर पैसे मिळण्याच्या आशेने ग्राहकांच्या रांगा लागलेल्या आहेत. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टीचे असतात त्यामुळे सोमवारी बँक मध्ये खूप मोठी लाईन असते. मात्र यादरम्यान बँकेतील कर्मचारी ग्राहकांना योग्य ती मदत करीत नाही. शासनाने घोषणा करूनसुध्दा अजूनपर्यंत शेतकऱ्यांना १०हजार रूपये कर्ज देण्यात आलेले नाही. बँकच्या इाटरनेट लिंक खूप कासव गतीने काम करतात आणि त्यामुळे ग्राहकांना तासन तास ताटकळत उभे राहावे लागते. शासनाचे कर्मचारी ग्राहकांशी सभ्य रीतीने वागत नाही. मुद्रा लोन या योजनेचा लाभ सामान्य नागरिकांना मिळत नाही, मुद्रा लोनसाठी बँकेतील कर्मचारी लाच मागतात म्हणून या योजनांचा लाभ सामान्य नागरिकांना मिळत नाही, अश्या कर्मचाऱ्यांना शिक्षा करण्यात यावी, शेतकऱ्यांना आपल्या शेतीची कामे सोडून बँकेसमोर पीक कर्ज मिळण्यासाी दिवसभर ताटकळत उभे रहावे लागत आहे. शासनाचे याकडे लक्ष नसून शासन सुस्त झाले आहे. मात्र त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. शासनाला शेतकऱ्यांची काळजी नाही त्यामुळे शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या संपुर्ण अडचणीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. करीता शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याचे आदेश शासनाने निर्गमित करावे अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे. या शिष्टमंडळात किशोर जोरगेवार, रवींद्र लोनगाडगे, नगरसेवक सुरेश पचारे, विशाल निंबाळकर, राजेश नायडू उपस्थित होते.

Web Title: Help the farmers, otherwise the agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.