ब्रम्हपुरी तालुक्यात आजपासून हेल्मेट सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:35 IST2021-01-08T05:35:34+5:302021-01-08T05:35:34+5:30
ब्रम्हपुरी : दुचाकीस्वारांच्या वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी नववर्षाच्या प्रारंभी जिल्ह्यात हेल्मेट ...

ब्रम्हपुरी तालुक्यात आजपासून हेल्मेट सक्ती
ब्रम्हपुरी : दुचाकीस्वारांच्या वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी नववर्षाच्या प्रारंभी जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला अनुसरून ब्रम्हपुरी पोलीस विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यामध्ये कर्तव्यावर येताना हेल्मेट घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय तालुक्यातच ही हेल्मेटसक्ती राहणार असून हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
याची जनजागृती करण्याच्या दृष्टीने ब्रम्हपुरी पोलीस हेल्मेट घालून दुचाकी रॅली काढून पोलीस ठाण्यात पोहोचले. हेल्मेट न घातल्यामुळे आतापर्यंत अनेक दुचाकीस्वारांचा अपघातात मृत्यू झाला आहे. हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे यांनी सर्वात आधी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती केली. ही मोहीम संपूर्ण तालुक्यात अत्यंत कडकपणे राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या दुचाकीस्वारांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले असून ब्रम्हपुरी तालुक्यातील नागरिकांनी दुचाकी चालविताना हेल्मेट घालूनच प्रवास करावा. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे यांनी दिला आहे.