ब्रम्हपुरी परिसरात वादळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:22 IST2021-02-20T05:22:08+5:302021-02-20T05:22:08+5:30

धान खरेदी केंद्रावरील उघड्यावर असलेल्या धानाला तथा रब्बीच्या पिकांना फटका ब्रम्हपुरी: गुरुवारी दुपारी ३ वाजता अचानक आलेल्या अवकाळी ...

Heavy rains hit Bramhapuri area | ब्रम्हपुरी परिसरात वादळी पावसाचा तडाखा

ब्रम्हपुरी परिसरात वादळी पावसाचा तडाखा

धान खरेदी केंद्रावरील उघड्यावर असलेल्या धानाला तथा रब्बीच्या पिकांना फटका

ब्रम्हपुरी: गुरुवारी दुपारी ३ वाजता अचानक आलेल्या अवकाळी वादळी पावसाचा शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. आधारभूत धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानासह रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दुपारी ३ वाजेच्या दरम्यान झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. ब्रम्हपुरी शहरात बुधवारपासूनच वातावरणात बदल जाणवत होता. गुरुवारी पाऊसच पडला. साधारणतः अर्धातास पडलेल्या पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आंब्याचा मोहोरसुद्धा मोठ्या प्रमाणात गळून पडला तूर, गहू, हरभरा, उडीद, मुंग,लाखोरी, वटाणा आदी रब्बीच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दुपारच्या सुमारास अचानक झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे काही काळ जनजीवन प्रभावित झाले होते. आलेल्या पावसाचा सर्वात जास्त फटका ग्रामीण भागाला बसला असून ग्रामीण भागातील रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील बहुतांश भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Heavy rains hit Bramhapuri area