प्रल्हाद मानेराव यांना भावपूर्ण निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:25 IST2021-08-01T04:25:29+5:302021-08-01T04:25:29+5:30

मूल : गेल्या अनेक वर्षांपासून कृषी विभागात अनेक पदावर कार्यरत असलेले प्रल्हाद मानेराव यांना कृषी विभागातील प्रत्येक कामांचा दांडगा ...

A heartfelt message to Pralhad Manerao | प्रल्हाद मानेराव यांना भावपूर्ण निरोप

प्रल्हाद मानेराव यांना भावपूर्ण निरोप

मूल : गेल्या अनेक वर्षांपासून कृषी विभागात अनेक पदावर कार्यरत असलेले प्रल्हाद मानेराव यांना कृषी विभागातील प्रत्येक कामांचा दांडगा अनुभव आहे, पारंपरिक शेती करण्यासाठी तांत्रिक साधनाचा नेहमीच शेतकऱ्यांना वापर करावा लागतो, यासाठी मानेरावांनी प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना मदत केली आहे, भविष्यातही मानेरावांनी कृषी विभागाला सहकार्य करीत राहावे, असे मत मूलचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी डी. आर. तिजारे यांनी व्यक्त केले.

तालुका कृषी विभागात तांत्रिक कृषी सहाययक प्रल्हाद मानेराव यांच्या सेवानिवृत्तीपर निरोप समारंभात ते बोलत होते.

कार्यक्रमाला बोरघाट उपसा सिंचन प्रकल्पाचे सहायक अभियंता कोमलवार, तालुका कृषी विभागाचे पर्यवेक्षक आर. एस. उईके, टी. बी. उईके, जी. के. पाटील, एम. एम. कारडे, संध्या सोनुले, वरिष्ठ लिपिक अनिल बोडे उपस्थित होते.

Web Title: A heartfelt message to Pralhad Manerao