राजुरातील ठाणेदारांना भावपूर्ण निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:34 IST2021-02-05T07:34:09+5:302021-02-05T07:34:09+5:30
यावेळी नवीन आलेले ठाणेदार चंद्रशेखर बहादूरे उपस्थित होते. सेवानिवृत्तीसाठी केवळ पाच महिने व वर्ष व्हायला दोन दिवस बाकी ...

राजुरातील ठाणेदारांना भावपूर्ण निरोप
यावेळी नवीन आलेले ठाणेदार चंद्रशेखर बहादूरे उपस्थित होते. सेवानिवृत्तीसाठी केवळ पाच महिने व वर्ष व्हायला दोन दिवस बाकी असताना, ठाणेकरांची तातडीने बदली झाल्याने येथे शंका उपस्थित होत होत्या. मात्र, ही बदली प्रशासकीय बाब असल्याचे खुद्द नरेंद्र कोसुरकर यांनी सांगितले.
राजुरा पोलीस स्टेशनमधील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगली साथ व या परिसरातील जनतेचे सहकार्य मिळाल्याने आपण येथे काम करू शकलो. त्यामुळे भविष्यात आपले प्रेम विसरता येणे शक्य नसल्याचे भावोद्गगार त्यांनी व्यक्त केले. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नरेंद्र कोसुरकर राजुरात असताना गुन्हेगारीवर वचक ठेवला. त्यासोबतच त्यांनी आपल्या साध्या सरळ स्वभावाने अनेकांना भुरळ घातली.