आरोपीच्या जामीन अर्जावर २८ ला सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:30 IST2021-04-23T04:30:26+5:302021-04-23T04:30:26+5:30
बुधवारी याप्रकरणी आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्यावर न्यायालयाने आता ही पुढील तारीख दिली आहे. बुधवारी कोर्टाची तारीख असल्याने ...

आरोपीच्या जामीन अर्जावर २८ ला सुनावणी
बुधवारी याप्रकरणी आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्यावर न्यायालयाने आता ही पुढील तारीख दिली आहे.
बुधवारी कोर्टाची तारीख असल्याने याप्रकरणी गेल्या २० दिवसापासून फरार असलेल्या व आता जामिनासाठी न्यायालयात धाव घेतलेल्या आरोपीला जामीन मिळणार काय, याकडे राजुरा तालुक्यातील लोकांचे लक्ष लागले होते.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होऊन २० दिवस उलटले असतानाही राजुरा पोलीस आरोपीला अटक करू शकले नाही. यामुळे येथे नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. जमानतीसाठी आरोपीने न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र पोलिसांची आरोपीला अटक करण्याबाबत अद्याप कसलीही हालचाल दिसून आलेली नाही. पोलीस कोरोनामुळे आम्हाला सध्या काही करता येत नाही, हाच पाढा गिरवीत आहेत.