संकल्प ग्रामविकास विहान प्रकल्पातर्फे आरोग्य कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:32 IST2021-01-16T04:32:54+5:302021-01-16T04:32:54+5:30

चंद्रपूर : राष्ट्रीय युवा दिनानिमित्त संकल्प बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था संचालित लिंक वर्कर प्रकल्प, चंद्रपूर व विहान प्रकल्पाच्या वतीने एचआयव्हीबाधित ...

Health Workshop by Sankalp Gram Vikas Vihan Project | संकल्प ग्रामविकास विहान प्रकल्पातर्फे आरोग्य कार्यशाळा

संकल्प ग्रामविकास विहान प्रकल्पातर्फे आरोग्य कार्यशाळा

चंद्रपूर : राष्ट्रीय युवा दिनानिमित्त संकल्प बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था संचालित लिंक वर्कर प्रकल्प, चंद्रपूर व विहान प्रकल्पाच्या वतीने एचआयव्हीबाधित रुग्णांची आरोग्य कार्यशाळा घेण्यात आली.

यावेळी अध्यक्षस्थानी एड्स प्रतिबंध नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी सुमंत पानगंटीवार, तर प्रमुख पाहुणे जिल्हा पर्यवेक्षक निरंजन मंगरूळकर, मार्गदर्शक एआरटी समुपदेशक सोनाली चौधरी, देवेंद्र लांजे, आदी उपस्थित होते.

एचआयव्हीबाधित बालकांना प्रोटीन पावडरचे वाटप करण्यात आले. नियमित औषधोपचार, शासकीय योजना, स्वतः व कुटुंबाने घ्यावयाची आरोग्यविषयक काळजी, पोषक आहार व उदरनिर्वाहासाठी पूरक स्वयंरोजगाराची माहिती, आदी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत ४० एचआयव्हीबाधित उपस्थित होते. लिंक वर्कर प्रकल्पाचे डीआरपी रोशन आकुलवार यांनी प्रास्ताविक, तर संचालन विहान प्रकल्पाच्या प्रकल्प व्यवस्थापक संगीता देवाळकर यांनी सूत्रसंचालन केले.

आयोजनासाठी लिंक वर्कर प्रकल्पाचे पर्यवेक्षक रूपाली मडावी, राकेश आमटे, मयूर घरोटे व विहान प्रकल्पाच्या ममता हिरेखण, पौर्णिमा गोंगले, धनिशा रंगारी, आदींनी सहकार्य केले.

Web Title: Health Workshop by Sankalp Gram Vikas Vihan Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.