धानोरकर दाम्पत्याकडून आरोग्य यंत्रणेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:29 IST2021-04-22T04:29:12+5:302021-04-22T04:29:12+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढत आहे. वरोरा-भद्रावती येथे मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या संख्येत वाढ होत ...

Health system inspection by Dhanorkar couple | धानोरकर दाम्पत्याकडून आरोग्य यंत्रणेची पाहणी

धानोरकर दाम्पत्याकडून आरोग्य यंत्रणेची पाहणी

चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढत आहे. वरोरा-भद्रावती येथे मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे येथील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्याकरिता ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणे, मुबलक औषधसाठा उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा वाढवा तसेच प्राथमिक उपचाराकरिता ग्रामीण भागातील शाळा ताब्यात घ्या, अशा सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी केल्या.

बुधवारी वरोरा, भद्रावती येथील आरोग्य यंत्रणेच्या आढावा खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांनी घेतला. कोरोनापासून प्रभावी लढा देण्याकरिता वैद्यकीय सुविधांच्या अभाव पडता कामा नये, ज्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्या आमदार निधीतून त्वरित उपलब्ध करण्यात येणार आहे. जनतेने देखील कोरोनाची भीती बाळगू नये. मी सदैव आपल्या पाठीशी आहे, असे खासदार बाळू धानोरकर यांनी आश्वासित केले.

वरोरा येथील वरोरा येथील ट्राम कोविड केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय व माता महाकाली कोविड सेंटर, आदिवासी वसतिगृह येथील आरटीपीसीआर केंद्र तसेच विलगीकरण केंद्राला भेट दिली. येथील रुग्णांच्या नातेवाईकांशी त्यांनी संवाद साधला. वसतिगृहात वैद्यकीय अधिकारी व पदाधिकारी यांची बैठक घेतली. त्यात काँग्रेस शहर अध्यक्ष विलास टिपले, नगरसेवक राजू महाजन, वरोरा विधानसभा अध्यक्ष शुभम चिमूरकर, आमदार प्रतिनिधी सुभाष दांदडे उपस्थित होते. भद्रावती येथे जैन मंदिर येथील कोविड सेंटर, ग्रामीण रुग्णालय, आरटीपीसीआर केंद्र येथे भेट दिली. त्यानंतर नगर परिषद भद्रावती येथे अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी अत्यावश्यक आरोग्य सुविधा ज्यांच्या तुटवडा जाणवत आहे. त्यांच्या आढावा घेण्यात आला. त्या आमदार निधीच्या माध्यमातून त्वरित उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, तहसीलदार महेश शिंतोळे, वैद्यकीय अधिकारी मनीष सिंग, डॉ. नितीन सातभाई, डॉ. असूटकर, पोलीस उपनिरीक्षक जगताप यांची उपस्थिती होती.

Web Title: Health system inspection by Dhanorkar couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.