सात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:28 IST2017-11-10T00:28:28+5:302017-11-10T00:28:51+5:30
कुठलीही पूर्व सूचना न देता दीडशे कामगारांना कामावरून कमी केल्याचा प्रकार तीन महिन्यांपूर्वी वर्धा पॉवर जनरेशन या वीज निर्मिती करणाºया कंपनीत घडला.

सात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : कुठलीही पूर्व सूचना न देता दीडशे कामगारांना कामावरून कमी केल्याचा प्रकार तीन महिन्यांपूर्वी वर्धा पॉवर जनरेशन या वीज निर्मिती करणाºया कंपनीत घडला. त्यामुळे कामगारांनी संघटित होऊन कंपनी प्रशासनाविरुद्ध आंदोलन केले. मात्र कुठलाही तोडगा न निघाल्याने ७ नोव्हेंबरपासून कामगारांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले. आंदोलनाच्या दुसºया दिवशी सात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर जागेची परवानगी नसल्याच्या कारणावरून आंदोलन उधळण्याचा डाव प्रशासनाकडून करण्यात आला.
शहरालगत असणाºया एमआयडीसी मधील साई वर्धा पॉवर या वीज प्रकल्पातील दीडशे कामगारांनी बुधावरी एकदिवसीय साखळी उपोषण केले. तर आज गुरूवारी ५० कामगारांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरूवात केली. मात्र यातील आशिष ढवस, विजू दातारकर, अतुल कुकुटकर, जयंत धकने, गजानन मानकर, मारोती ुडुडुरे, मुनेश्वर आगलावे या ७ उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
ज्या जागेवर कामगारांनी उपोषण सुरु केले, ती जागा एमआयडीसीच्या मालकिची असल्याने आंदोलन उधळण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आल्याचा आरोप प्रहारचे अमोल डुकरे यांनी केला आहे .