अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे आरोग्य सेवा कोलमडली
By Admin | Updated: March 6, 2015 01:16 IST2015-03-06T01:16:00+5:302015-03-06T01:16:00+5:30
जिवती व कोरपना तालुक्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे रूग्णांची गैरसोय होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे.

अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे आरोग्य सेवा कोलमडली
चंद्रपूर : जिवती व कोरपना तालुक्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे रूग्णांची गैरसोय होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे.
जिवती व कोरपना येथे तालुका आरोग्य अधिकारी म्हणूून काम पाहणारे हे गेल्या दोन ते तीन वर्षापासून महिन्यात तीन ते चार दिवस कार्यालयात हजर असतात. ते दोन्ही तालुक्यात आरोग्य सेवेचे शासकीय नियम डावलून आपल्या मर्जीनुसार कारभार करीत आहेत.
तसेच वैद्यकीय अधिकारी हे प्रा.आ. केंद्रस्तरावर जे प्रशिक्षण शिबिर, बैठका घेण्यासाठी निधी येतो तो स्वत:च्या मर्जीने वैद्यकीय अधिकाऱ्यांना न देता स्वत: कमी खर्चात व जागृती न करता खर्च केल्या जाते. कोणतेही प्रशिक्षण घेतल्या जात नाही. पल्स पोलिओ प्रशिक्षण घेण्यात आले नाही. कुष्ठरोग प्रशिक्षणासाठी जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व प्रतिष्ठित नागरीक यांचे प्रशिक्षण घेणे अपेक्षित होते. परंतु, असे कोणतेही प्रशिक्षण न घेता आलेल्या निधीचा खर्च झाला आहे. शासन जनजागृतीवर भर देत असला तरी आलेला पैसा स्वत: हडप केला जात असल्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. याची चौकशी करण्याची मागणी स्वर्गीय अण्णाभाऊ साठे बहुउद्देशिय संस्थेने केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)