उघड्या पाण्याच्या टाकीमुळे आरोग्याला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:26 IST2021-03-19T04:26:39+5:302021-03-19T04:26:39+5:30
नळाव्दारे मिळणारेच पाणी ग्रामस्थ नेहमी पित असतात. परंतु या बांधण्यात आलेल्या टाकीलाच वरून झाकण बसविण्यात न आल्यामुळे येथील नागरिकांच्या ...

उघड्या पाण्याच्या टाकीमुळे आरोग्याला धोका
नळाव्दारे मिळणारेच पाणी ग्रामस्थ नेहमी पित असतात. परंतु या बांधण्यात आलेल्या टाकीलाच वरून झाकण बसविण्यात न आल्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक प्रकारचे पक्षी बसून राहतात. त्यांची विष्ठा या पाण्यामध्ये पडते. त्या पाण्यामध्ये अनेक प्रकारचे किडे, जंतू मृत अवस्थेत असतात. तसेच वानरसुध्दा नेहमीच टाकीमध्ये उतरत असतात. त्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत भीती निर्माण झाली आहे. दोन वर्षांपासून उघड्यावरील पाणी पित आहेत. अजून किती दिवस अशुद्ध व आरोग्यास अपायकारक पाणी लागेल, असा सवाल वाठोडा ग्रामवासी करीत आहेत. एखादा अनुचित प्रकार घडण्याअगोदर या टाकीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांनी या टाकीला झाकण बनवून द्यावे, अशी मागणी येथील पोलीस पाटील राजेंद्र अहिरकर, ग्रामपंचायत सदस्य धनराज सायकार यांनी केली आहे.