लोकांच्या गरजेनुसार मिळाव्यात आरोग्य सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2016 01:10 IST2016-01-18T01:10:28+5:302016-01-18T01:10:28+5:30

लोकांच्या गरजांनुसार त्यांना आरोग्य सेवा मिळाव्यात. त्याचप्रमाणे शिबीरांचेही नियोजन व्हावे. केवळ देखाव्यापूरते हे होता कामा नये,

Health facilities to meet people's needs | लोकांच्या गरजेनुसार मिळाव्यात आरोग्य सुविधा

लोकांच्या गरजेनुसार मिळाव्यात आरोग्य सुविधा

वैभव पोडचलवार : झोपडपट्टी भागात महाआरोग्य शिबिर
चंद्रपूर : लोकांच्या गरजांनुसार त्यांना आरोग्य सेवा मिळाव्यात. त्याचप्रमाणे शिबीरांचेही नियोजन व्हावे. केवळ देखाव्यापूरते हे होता कामा नये, असे विचार डॉ. वैभव पोडचलवार यांनी व्यक्त केले.
बायपास मार्गावरील शंकरनगर येथे केअर पॉलिक्लिनिकमध्ये गरीब आणि गरजू लोकांसाठी मनोरमा हेल्थ केअर ट्रस्टच्या वतीने महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. त्यावेळी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. शिबीराच्या उद्घाटनाला जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अस्थिशल्य चिकित्सक डॉ. विकील किरणापुरे, शहरातील नामवंत हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनुप वासाडे, परिसरातील समाजसेवी अजय सरकार, नितीन शहा, मनोरमा हेल्थ केअर ट्रस्टचे कोषाध्यक्ष डॉ. राकेश वनकर, रनेंद्र मंडल, पार्वती रॉय आणि ट्रस्टचे पीआरओ मुकेश वाळके प्रामुख्याने उपस्थित होते. मनोरमाचे अध्यक्ष डॉ. पोडचलवार म्हणाले, गेल्या तीन वषार्पासून आरोग्यसेवेचे व्रत घेऊन काम करताना अनेकांना मदतीचा हात देण्याचे काम प्रामाणिकपणे झाले आहे. यापुढेही ते चालत राहील. इतरांनीही यावेळी आरोग्यावर मार्गदर्शन केले. दरम्यान, या महाशिबिरात सुमारे ३०० लोकांची ९ मोठे आजार आणि इतर सर्व रोगांची मोफत तपासणी करण्यात आली. कारडा यंत्राच्या सहाय्याने संपूर्ण शरीराची विशेष तपासणी पहिल्यांदाच या परिसरात झाली. याशिवाय रक्त चाचण्या आणि इतरही अनेक चाचण्या नि:शुल्क करण्यात आल्या. शिबीराला मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Health facilities to meet people's needs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.