आरोग्य तपासणी करणे गरजेचे

By Admin | Updated: February 26, 2017 00:50 IST2017-02-26T00:50:50+5:302017-02-26T00:50:50+5:30

विदेशात आजाराविषयी खूप जागरुक्ता आहे. विदेशात खूप कमी व्यक्ती आजारी पडतात. देशात व विदेशात आजाराविषयी फरक जाणवतो.

Health checkups need to be done | आरोग्य तपासणी करणे गरजेचे

आरोग्य तपासणी करणे गरजेचे

पी. एम. मुरंबीकर : दंतरोग निदान व उपचार शिबिर
चिमूर : विदेशात आजाराविषयी खूप जागरुक्ता आहे. विदेशात खूप कमी व्यक्ती आजारी पडतात. देशात व विदेशात आजाराविषयी फरक जाणवतो. विदेशात व्यक्तीला आजार नसेल तरी नियमीत आरोग्याची तपासणी केली जाते. मात्र आपल्याकडे आजारी पडलो तरी दवाखाण्यात जात नाही व आरोग्याची तपासणी करीत नाही. त्यामुळे आजाराचे प्रमाण आपल्याकडे वाढलेले आहेत. यावर मात करण्यासाठी आरोग्याची नियमीत तपासणी करावी, असे प्रतिपादन डॉ. पी.एस. मुरंबीकर यांनी केले.
चिमूर उपजिल्हा रुग्णालयात नि:शुल्क दंत तपासणी, वैद्यकीय रोग निदान व उपचार शस्त्रक्रिया शिबिर आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पी.एम. मुरंबीकर बोलत होते.
सदर शिबिराचे उद्घाटन चिमूरचे उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पी.एम. मुरंबीकर, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्रीराम गोगुलवार, डॉ.गावंडे, गटशिक्षण अधिकारी किशोर पिसे, चिमूर तालुका प्रेस असो.चे अध्यक्ष चुन्नीलाल कुडवे, नगरसेविका छाया कंचर्लावार, कल्पना इंदूरकर, जयश्री निवटे, उमेश हिंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. मुरंबीकर म्हणाले, पूर्वीचे व्यक्ती सहसा फारसे आजारी पडत नव्हते. त्याना मेहनतीचे काम करण्याची सवय होती. आपले विचार व सवयी योग्य असतील तर आपणाला दवाखाण्यात जाण्याची गरज नाही. आरोग्यही चांगले राहील. व्यक्ती हा दिवसेंदिवस व्यसनाधीन होत आहे. रोज चंद्रपुरात दहा क्विंटल खर्राची सुपारी विकली जाते. पूर्वीच्या काळी मानवायीकांना जेवणानंतर सोप, ओवा, आवळा सुपारी दिली जात होती. मात्र आधुनिक काळात जेवणानंतर खर्रा दिला जातो. या सवयी बदलने आवश्यक आहे. तरच आपले आरोग्य चांगले राहील. आजार जरी जळला नसेल तरीही आरोग्य तपासणी करुन डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन सुमेध साखरे, प्रास्ताविक डॉ.अश्विन अमडे, आभार डॉ.दिगांबर मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Health checkups need to be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.