ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आरोग्य शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:42 IST2021-02-05T07:42:01+5:302021-02-05T07:42:01+5:30
चंद्रपूर : कोणत्याही आजाराला छोटा आजार समजून त्याकडे दुर्लक्ष केल्यास तोच आजार वाढत जातो. आपला जीव गमवावा लागण्याची भीती ...

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आरोग्य शिबिर
चंद्रपूर : कोणत्याही आजाराला छोटा आजार समजून त्याकडे दुर्लक्ष केल्यास तोच आजार वाढत जातो. आपला जीव गमवावा लागण्याची भीती असते, त्यामुळे आजार झाल्यास ताबडतोब डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करा, असे आवाहन जनरल सर्जन तथा पोटविकार तज्ज्ञ डॉ. ललित तामगाडगे यांनी केले.
महेशनगर येथे ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिरात ते बोलत होते. यावेळी अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सुनील मल्लोजवार, जनरल फिजिशियन डॉ. अभिजित सावलकर, नेत्रतज्ज्ञ डॉ. महेश बनिक, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. किरण पटेल, बालरोगतज्ज्ञ डॉ. पल्लवी डोंगरे, दंतरोगतज्ज्ञ डॉ. एकता तामगाडगे, फिजिओथेरपिस्ट डॉ. दीपांजली सावलकर आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी मधुमेह, बीपी यासारख्या आजारावर तसेच कोरोना काळात ज्येष्ठांनी कशी काळजी घ्यावी याविषयी उपस्थित डाॅक्टरांनी माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांनी समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी परिसरातील शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. रुग्णांना मोफत औषधांचे वितरण करण्यात आले.आभार गंगाधर पिदुरकर यांनी मानले. शिबिराच्या आयोजनाकरिता ज्येष्ठ नागरिक संघाचे गुलाब लोणकर, विश्वनाथ तामगाडगे, वामण मंदे, बाबाराव पडवे, रत्नमाला नरड, जे. डी. पोटे, भरत डांगे, बोडखे गुरुजी, मंदार सहस्त्रबुद्धे, दयाराम उराडे, प्रभाकर देठेकर,रवी नरड, जगदीश लोनकर आदींनी सहकार्य केले.