चंद्रपुरात सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर

By Admin | Updated: October 11, 2015 02:16 IST2015-10-11T02:16:43+5:302015-10-11T02:16:43+5:30

चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूरच्या वतीने राजे धर्मराव प्राथमिक शाळेत बुधवारी चंद्रपूर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या

Health camp for cleaning workers at Chandrapur | चंद्रपुरात सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर

चंद्रपुरात सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर

४०० कर्मचाऱ्यांची तपासणी : औषधांचे मोफत वाटप, दोन शिबिरांचे करणार आयोजन
चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूरच्या वतीने राजे धर्मराव प्राथमिक शाळेत बुधवारी चंद्रपूर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ४०० सफाई कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. या कर्मचाऱ्यांना औषधीचे मोफत वाटप करण्यात आले.
यापुढेही ज्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचार करणे आवश्यक आहे त्यांना तज्ज्ञ डॉक्टर मंडळीचा सल्ला देण्यात आला असून त्यासंबंधीचा पाठपुरावा मनपाकडून केल्या जाईल. अशा प्रकारची आणखी दोन आरोग्य तपासणी शिबिरे यानंतर घेण्यात येणार आहेत. मनपातर्फे प्रथमच शासनाच्या सुचनेनुसार सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. चंद्रपूर शहराची स्वच्छता राखताना भर उन्हात पावसात चिखलात काम करीत असलेल्या महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या सेवेमुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहते. त्यामुळे कर्मचारी निरोगी तर शहर निरोगी, या तत्वानुसार या कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असून त्याकरीता होणारा खर्च चंद्रपूर शहर महानगरपालिका करणार आहे, असे मनपाचे आयुक्त सुधीर शंभरकर यांनी आवाहन केले.
सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिरास उपस्थित असलेल्या महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर वसंत देशमुख, सभापती स्थायी समिती संतोष लहामगे, सभापती झोन क्र. १ अंजली घोटेकर, सभापती महिला व बालकल्याण समिती एस्तेर शिरवार, नगरसेवक रितेश तिवारी, बलराम डोडाणी, विनयकुमार जोगेकर तसेच चंद्रपूर शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी, अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले.
डॉ. रवी अल्लुरवार, डॉ. योगेश सालफळे, डॉ. सुधीर रेंगुडवार, डॉ. प्रविण पंत, डॉ. रोहन आर्इंचवार, डॉ. मनिष मुंधडा, डॉ. सतीश तातावार, डॉ. आनंद बेंडले, डॉ. विवेक बांबोळे, डॉ. शलाका मामीडवार, डॉ. वंदना रेंगुडवार, डॉ. किरण देशपांडे, डॉ. शिवजी, डॉ. उमेश अग्रवाल, डॉ. अमित मामीडवार यांनी रुग्णांनी तपासणी केली.
शिबिर यशस्वी करण्यास मनपाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. जी.सी. सोयाम व शहर कार्यक्रम व्यवस्थापक नरेंद्र जनबंधू तसेच नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वाडे, डॉ. भारत, डॉ. राजुरवार, डॉ. आकुलवार, पातनुरवार, गर्गेलवार, मैलारपवार, राजुरकर, विकास दानव, सोनटक्के, निर्मळे व देवानंद कांबळे यांचे सहकार्य लाभले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Health camp for cleaning workers at Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.