आणखी दोघांची प्रकृती खालावली
By Admin | Updated: February 4, 2017 00:34 IST2017-02-04T00:34:59+5:302017-02-04T00:34:59+5:30
घुग्घुस येथील गुप्ता एनर्जीच्या प्रकल्पग्रस्तांनी मागण्यांच्या पूर्ततेसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.

आणखी दोघांची प्रकृती खालावली
उपोषणकर्त्यांत संताप : उपोषण चिघळत असतानाही प्रशासनाचे दुर्लक्षच
चंद्रपूर : घुग्घुस येथील गुप्ता एनर्जीच्या प्रकल्पग्रस्तांनी मागण्यांच्या पूर्ततेसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी आठव्या दिवशीही आंदोलन सुरू होते. दरम्यान, गुरुवारी पाच उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी आणखी दोघांची प्रकृती खालावल्याने त्यांनाही रुग्णालयात हलविले आहे.
एकापाठोपाठ एक उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असतानाही कंपनी व्यवस्थापन व जिल्हा प्रशासन मूग गिळून बसले आहेत. अशा निगरगट्ट व्यवस्थापन व प्रशासनामुळे संताप व्यक्त केला जात आहे. काल गुरुवारी बंडू चटकी, प्रविण भगत, सुरेश जेनेकर, रवींद्र गोहोकार व अमोल बोढाले अशी या उपोषणकर्त्यांची नावे आहेत. येथील गुप्ता एनर्जी प्रकल्पाला कृषी योग्य उपजाऊ जमीन दिल्या. पिढीजात शेती व्यवसाय गेला. कारखान्यात नोकरी मिळाली असती तरी गेल्या तीन वर्षांपासून कारखाना बंद पडला आहे. प्रकल्पग्रस्तांना काम नाही, केलेल्या कामाचे तीन महिने वेतन नाही. त्यांचे व कुटुंबायाचे भविष्यत अंधारात आहे. न्याय मिळावा म्हणून शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी एकाची प्रकृती हालवली आणि दवाखान्यात दाखल केले. मात्र शासन प्रशासन, लोक प्रतिनिधीकडून दखल घेतली गेली नसल्याने प्रकल्पग्रस्तामध्ये तीव्र असंतोष फोफावला आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी रविंद्र गोहोकार या उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडली होती आणि दवाखान्यात दाखल करण्यात आले. दरम्यान उपोषणाला बसलेल्या शेणगाव येथील बंडू चटकी याच्या आईने मुलाच्या भविष्याच्या चिंतेत व्यथित होऊन घरी खाणेपिणे सोडले.
त्यामुळे प्रकृती बिघडली तर अमर शेंडे या आंदोलनकर्त्यांच्या अडीच वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली आहे.
त्याला चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे. (शहर प्रतिनिधी)