२६१ बाधित कोरोनातून बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:01 IST2020-07-28T05:00:00+5:302020-07-28T05:01:55+5:30

तत्पूर्वी तेलंगणा येथील एका महिलेचा २४ जुलैला मृत्यू झाला. तिचा स्वॅब चंद्रपूर येथे पॉझिटिव्ह आला होता. याशिवाय एका महिलेला कोरोनाशिवाय अन्य आजाराच्या गंभीरतेमुळे नागपूरला हलविण्यात आले आहे. या दोन पॉझिटिव्हमुळे चंद्रपूर जिल्ह्याची आतापर्यंतची एकूण पॉझिटिव्ह संख्या ४२८ झाली आहे.

Healed from 261 infected corona | २६१ बाधित कोरोनातून बरे

२६१ बाधित कोरोनातून बरे

ठळक मुद्देनव्या २३ रुग्णांची नोंद : एकूण बाधित ४२८

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४२८ झाली आहे. २६१ बाधित बरे झाले असून १६५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी नव्या २३ बाधितांची जिल्ह्यात नोंद झाली आहे.
तत्पूर्वी तेलंगणा येथील एका महिलेचा २४ जुलैला मृत्यू झाला. तिचा स्वॅब चंद्रपूर येथे पॉझिटिव्ह आला होता. याशिवाय एका महिलेला कोरोनाशिवाय अन्य आजाराच्या गंभीरतेमुळे नागपूरला हलविण्यात आले आहे. या दोन पॉझिटिव्हमुळे चंद्रपूर जिल्ह्याची आतापर्यंतची एकूण पॉझिटिव्ह संख्या ४२८ झाली आहे.
सोमवारी पुढे आलेल्या बाधितांध्ये बल्लारपूर शहरातील युवकांचा समावेश आहे. दुसरा युवक वाराणसी येथून आला असल्याची नोंद आहे. चिमूर तालुक्यातील वडाळा पैकु येथील टिचर कॉलनीत राहणाऱ्या पती-पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चिमुरातीलच इंदिरा नगर चेंबूर येथील एक महिला पॉझिटिव्ह ठरली आहे. सिंदेवाही येथील एक महिला व तिचे २४ व १९ वर्षीय मुले पॉझिटिव्ह आले आहेत. सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी येथील युवक पॉझिटिव्ह ठरला आहे. याशिवाय गुंजेवाही येथील युवकदेखील पॉझिटिव्ह आला आहे. सिंदेवाही शहरातील युवक पॉझिटिव्ह आला आहे. गडचांदूर येथील एकता नगर वार्ड क्रमांक ४ मधील मुलगा, लक्ष्मी थेटर जवळील रहिवासी पुरुष, कोरपना तालुक्यातील पालगाव येथील ६० वर्षीय व्यक्ती संपर्कातून पॉझिटिव्ह ठरला आहे. चंद्रपूर येथील पैनगंगा पोलीस कॉर्टर परिसरातील व्यक्ती, रयतवारी येथील व्यक्ती व जटपुरा वार्ड येथील महिला पॉझिटिव्ह ठरली आहे.
याशिवाय रात्री उशिरा माजरी, बल्लारपूर व घुग्घुस, राजुरा व चिमूर येथील प्रत्येकी एका बाधिताचा समावेश आहे.

Web Title: Healed from 261 infected corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.