चंद्रपूर : २७ जानेवारीपासून इयत्ता ५वी ते ८वीचे वर्ग सुरु होणार आहेत. शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती अत्यावश्यक आहे. त्यामुळे शिक्षक तसेच मुख्याध्यापक पालकांची संमती मिळविण्यासाठी धडपड करीत आहेत. कोरोना संकटामुळे ९वी ते १२वीचे वर्ग सोडता अद्याप शाळा सुरू झाल्या नाहीत. आता कोरोना संकट काही प्रमाणात कमी होत आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या हालचाली प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. २७ जानेवारीपासून ५ ते ८ वीचे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी प्रशासनासह शाळांनीही तयारी सुरु केली आहे. स्वच्छता, सॅनिटायझेशन तसेच इतर आवश्यक सुविधाही पुरविल्या जात आहेत. जिल्ह्यात ७५०च्या वर इयत्ता ५ ते ८वीच्या शाळा असून, मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वर्ग सुरू करण्यासाठी पालकांची संमती आवश्यक आहे. त्यामुळे तसे प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे, जे पालक संमती देणार नाहीत. त्यांच्या पाल्यांसाठी ऑनलाईन क्लासेसचा पर्याय खुला आहे.
संमतीपत्रासाठी मुख्याध्यापकांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:42 IST