मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कमालीची दफ्तर दिरंगाई

By Admin | Updated: July 20, 2015 00:48 IST2015-07-20T00:48:08+5:302015-07-20T00:48:08+5:30

कोरपना तालुक्यातील बहुतेक शासकीय कर्मचारी हे नोकरीच्या ठिकाणी अर्थात मुख्यालयी स्थायिक नसून इतर ...

The head office of the non-head office due to the delayed office | मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कमालीची दफ्तर दिरंगाई

मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कमालीची दफ्तर दिरंगाई

दैनंदिन कामकाजावर परिणाम : वरिष्ठांना माहीत असूनही कारवाई शून्य
कोरपना : कोरपना तालुक्यातील बहुतेक शासकीय कर्मचारी हे नोकरीच्या ठिकाणी अर्थात मुख्यालयी स्थायिक नसून इतर तालुक्यातून रोज ये-जा करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये डॉक्टर, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षकांपासून सर्वच क्षेत्रातील सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश दिसून येतो.
सहाव्या वेतन आयोगामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना दरमहा मोठ्या पगाराची मिळकत होत असल्याने त्यांचे राहणीमान निश्चितच उंचावले आहे. ही बहुतेक मंडळी आपली कुटुंबे पॉश शहरात वास्तव्यास ठेऊन दुचाकी वाहनाने ३० ते ४० कि.मी. अंतरावरील आपल्या नोकरीच्या ठिकाणी हजेरी लावत असतात.
र्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे आढळून येते. यात शिक्षक वर्ग आघाडीवर असून कोरपना व परिसरातील गावात नोकरीवर असणारे शिक्षक थेट वणी जि. यवतमाळ, राजुरा व गडचांदूर येथून ये-जा करणारे आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना शासन घरभाडे भत्ता देत असते. मात्र या भत्त्यास सदर कर्मचारी खरोखरच योग्य आहे काय, याची शहानिशा करणे येथील वरिष्ठ अधिकारी महत्त्वाचे समजत नाही. किंबहुना, कोरपननाचे वरिष्ठ अधिकारी स्वत:च मुख्यालयी वास्तव्यास राहत नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा हा प्रकार सुरू आहे.
दरम्यान, कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने त्यांच्या कामातील दिरंगाई वाढत आहे. ही बाबसुद्धा वरिष्ठ अधिकारी दुर्लक्षित करीत आहेत.
कोरपना तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तर चक्क एक चार चाकी वाहनच भाड्याने घेतल्याचे समजते. ही सर्व मंडळी राजुरा ते कोरपना असा सुमारे ४५ किमीचा रोज प्रवास करीत असतात. मुख्यालयी वास्तव्यास नसतानाही त्यांना नियमित घरभाडे भत्ता अदा होत असल्याची माहिती आहे. हे सारे येथील तहसिलदारांना माहित असूनही त्यांना घरभाडे मिळते कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तलाठीसारख्या महत्त्वाच्या पदावर असणारे कर्मचारीसुद्धा बाहेर गावाहून ये-जा करतात. तलाठी महोदय कधी घरून निघालेले असतात. मात्र कार्यालयात पोहचलेले नसतात. दुसरीकडे कार्यालयातून आताच बाहेर गेल्याचे सहकारी सांगतात.
अशा वेळी गरजवंतांना सतत हेलपाटे खावे लागतात. या हेलपाट्याव्यतिरिक्त कामाचा मोबदला म्हणून द्यावी लागणारी ‘दक्षिणा’ ती वेगळीच. अर्थात् याला येथील काही तलाठी अपवादही आहेत. मात्र त्यांची संख्या नगण्य दिसते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The head office of the non-head office due to the delayed office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.