ड्रम चोरीवरून मारहाण केली म्हणून त्याने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:33 IST2021-09-15T04:33:07+5:302021-09-15T04:33:07+5:30

योगेश रमेश बोबडे या युवकाने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. योगेश हा मजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. घटनेच्या ...

He was strangled for stealing a drum | ड्रम चोरीवरून मारहाण केली म्हणून त्याने घेतला गळफास

ड्रम चोरीवरून मारहाण केली म्हणून त्याने घेतला गळफास

योगेश रमेश बोबडे या युवकाने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. योगेश हा मजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. घटनेच्या आदल्या दिवशी ड्रमची चोरी केली म्हणून एका इसमाने योगेश याला चांगलीच मारहाण केली. त्यानंतर योगेश घरी आलाच नाही, अशी माहिती आहे. त्याच्या पत्नीने आपल्या पतीला मारहाण करण्यात आली आहे. तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली होती. रात्री पोलिसांनी शोधाशोध केली; पण योगेश कुठेही दिसला नाही; मात्र सकाळीच शेतात गळफास घेऊन असलेल्या अवस्थेत योगेश दिसून आला. या आत्महत्येवरून गावात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. या आत्महत्येवर शंका निर्माण केली जात होती. अशातच विरूर पोलिसांनी तपासाची सूत्रे हलविली असता योगेशला मारहाण झाल्यामुळे तो आत्महत्येस प्रवृत्त झाल्याची बाब पुढे आली. राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण व पोलीस उपनिरीक्षक सदानंद वडतकर करीत आहेत.

Web Title: He was strangled for stealing a drum