प्रेयसीला लग्नाचा नकार दिल्याने लागल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:32 IST2021-09-15T04:32:54+5:302021-09-15T04:32:54+5:30

जीवनापूर येथील घटना ; प्रियकरास अटक सावरगाव : नागभीड तालुक्यातील पोलीस स्टेशन तळोधी (बा.) अंतर्गत येत असलेल्या जीवनापूर येथील ...

He was handcuffed for refusing to marry his beloved | प्रेयसीला लग्नाचा नकार दिल्याने लागल्या बेड्या

प्रेयसीला लग्नाचा नकार दिल्याने लागल्या बेड्या

जीवनापूर येथील घटना ; प्रियकरास अटक

सावरगाव : नागभीड तालुक्यातील पोलीस स्टेशन तळोधी (बा.) अंतर्गत येत असलेल्या जीवनापूर येथील एका २२ वर्षीय युवकाने लग्नाचे आमिष दाखवून आपल्या प्रेयसीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, नंतर लग्नास नकार दिल्याने प्रेयसीने पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी विवेक जनबंधू, जीवनापूर या प्रियकरावर गुन्हा दाखल करून, तळोधी पोलिसांनी त्याला सोमवारी अटक केली आहे.

तालुक्यातील जीवनापूर येथील विवेक जनबंधू हा युवक आपल्या प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. मात्र, लग्नाचा विषय समोर येताच त्याने नकार दिला. प्रेयसीने तळोधी पोलीस स्टेशन येथे प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी प्रियकरावर कलम ३७६ भादंवि अन्वये गुन्ह्याची नोंद अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक डी.आर. शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाशकुमार साखरे करीत आहेत.

Web Title: He was handcuffed for refusing to marry his beloved