शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अन् त्याने चार वर्षीय चिमुकलीला तुडुंब भरलेल्या विहिरीत फेकले, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 11:49 IST

पलक ही बाहेर अंगणात घोडागाडी खेळत होती. अशातच गावातील वेडसर तरुण तेथे आला आणि पलकला ‘घोडागाडी मला दे’ अशी मागणी करू लागला. मात्र पलकने नकार देताच रागाच्या भरात अनिकेतने पलकला शेजारच्या तुडुंब भरलेल्या विहिरीत फेकले.

ठळक मुद्देपाईपमुळे बचावली

वेदांत मेहरकुळे

चंद्रपूर : वडील कामावर आणि आई घरात काम करीत असताना चार वर्षीय चिमुकली घोडागाडीवर खेळत होती. अशातच गावातील एक १६ वर्षीय वेडसर तरुण तेथे आला आणि घोडागाडीची मागणी करू लागला. मात्र, चिमुकलीने नकार देताच रागाच्या भरात त्याने त्या चिमुकलीला चक्क तुडुंब भरलेल्या विहिरीत फेकले. विहिरीतील पाईपचा आधार घेत चिमुकलीने आरडाओरड करताच आसपासच्या लोकांनी तिला बाहेर काढले व चिमुकलीचे प्राण वाचले. ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील खराळपेठ गावात घडल्याची माहिती बुधवारी उजेडात आली.

पलक विकास गुडपल्ले (वय ४), रा. खराळपेठ असे या चिमुकलीचे नाव आहे. दैनंदिन नित्यक्रमाने विकास गुडपल्ले हे आपल्या कामावर गेले असताना त्यांची पत्नी ही घरातील कामे आटोपत होती. चार वर्षीय पलक ही बाहेर अंगणात घोडागाडी खेळत होती. अशातच गावातील तरुण अनिकेत भोयर हा तेथे आला आणि पलकला ‘घोडागाडी मला दे’ अशी मागणी करू लागला. मात्र पलकने अनिकेतला नकार देताच रागाच्या भरात अनिकेतने पलकला शेजारच्या तुडुंब भरलेल्या विहिरीत फेकले.

विहिरीत पडताच पलकने विहिरीतील पाईपला पकडून आरडाओरड सुरू केली. पलकच्या जोराने ओरडण्याचा आवाज येताच आसपासच्या लोकांनी धाव घेतली. अथक प्रयत्नातून तिला बाहेर काढले. तिचे प्राण वाचविले. एकंदरीत या संपूर्ण घटनेचा थरार बघता उपस्थित अनेकांची भंबेरी उडाली असून, ही घटना बुधवारी उघडकीस आली. याबाबत अधिक माहिती घेतली असता अनिकेत भोयर हा वेडसर तरुण असून मनोरुग्ण असल्याने याबाबत पोलिसात कुठल्याही गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती मिळाली नाही आहे. तर घटनेत पलकला किरकोळ जखमा झाल्या असून तिला उपचारांकरिता रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती मिळाली.

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारी