‘त्यांनी’ आईला दिली अनोखी भेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2017 01:04 IST2017-03-17T01:04:35+5:302017-03-17T01:04:35+5:30

पूर्वी जन्मतारीख नोंदीचे महत्व आजच्या सारखे अनन्यसाधारण नव्हते. त्यामुळे, शासकीय दफ्तरी जन्म तारखेची नोंद केली जात नसे.

'He gave a unique gift to the mother!' | ‘त्यांनी’ आईला दिली अनोखी भेट!

‘त्यांनी’ आईला दिली अनोखी भेट!

अन् अश्रू अनावर झाले : जन्मतारीख माहीत नसल्याने तारीख केली पक्की
वसंत खेडेकर   बल्लारपूर
पूर्वी जन्मतारीख नोंदीचे महत्व आजच्या सारखे अनन्यसाधारण नव्हते. त्यामुळे, शासकीय दफ्तरी जन्म तारखेची नोंद केली जात नसे. या कारणास्तव आज वयाची ६०-७० वर्षे पार केलेल्या ज्येष्ट नागरिकांना आपली जन्मतारीख नेमकी कोणती हेच ठाऊक नाही. ते अपाला वाढदिवस साजरा करु शकत नाही. त्यांच्या मुला-मुलींनाही, त्यांच्या मनात असूनही आपल्या आई-वडीलांचे वाढदिवस साजरे करता येत नाही. आपल्या आईचा वाढदिवस, तिची जन्मतारीख ठाऊक नाही म्हणून आपण साजरे करु शकत नाही याची खंत येथील किल्ला वॉर्डातील रहिवासी असलेल्या एका संयुक्त कुटुंब असलेल्या आणि आईवर भरपूर प्रेम करणाऱ्या मुलामुली आणि सुनांना वाटत होती. त्यावर त्यांनी एक चांगला तोडगा काढून आपल्या आईला अनोखी भेट दिली.
आईची जन्म तारीख माहित नाही म्हणून काय झाले? तिचा वाढदिवस करायचाच ही कल्पना मुला-मुलींना या महिला दिनी सूचली. आणि आईचा वाढदिवस महिला दिन असा ठरवून तो साजरा करण्याचे साऱ्यांनी ठरविले. सासूवर आईसारखे प्रेम करणाऱ्या सुनानांही ही आनंददायी कल्पना आवडली व त्यांनी कार्यक्रमाकरिता पुढाकार घेतला. आईला न सांगता व तिला याबाबत काहीही माहित होऊ नये, याची काळजी घेत मुलं, मुली व सुनांनी वाढदिवसाची तयारी केली. बाजारातून केक आणला. आईला, तिचा वाढदिवस साजरा करीत आहो, हे माहीत न करता वेगळेच कारण सांगून तिला तयार केले.
कार्यक़माकरिता सारे तयार झाले आणि पूर्ण तयारी झाल्यानंतर औक्षवंतचे ताट आणि केक आईपुढे ठेवला व साऱ्यांनी ‘हॅपी बर्थ डे’ करीत तिला शुभेच्छा दिल्या.
हा काय प्रकार आहे, हे आईच्या प्रथम लक्षात आले नाही. पण, साऱ्यांनी तिला केक कापायला आग्रह केला आणि सारे सांगितले. तेव्हा हा खटाटोप तिच्या लक्षात आला. वयाच्या ६० व्या वर्षी, प्रथमच आपला वाढदिवस मुलं, मुली व सूना या मोठ्या प्रेमाने व उत्साहाने साजरा करीत असल्याचे बघून त्या माऊलीच्या डोळ्यात आनंदाश्रु तरळले.
मुलं, मुली, सूना, नातवंड अशा नऊ सदस्यांनी भरलेल्या येथील किल्ला वॉर्डातील एका कुटुंबातील आईच्या अनोख्या वाढदिवसाची ही आनंददायी, हृदयस्पर्शी व प्रेरक कथा! आता, या नशिबवान आईचा वाढदिवस दरवर्षी महिलान दिनी साजरा केला जाणार आहे. असे असावे कुटुंब आणि एकमेकांवर जिव्हाळ्याने प्रेम करणारे मुलं, मुली आणि सुना!


संयुक्त कुटुंबपद्धतीची
वेगळीच मजा
आजच्या स्पर्धेच्या युगात संयुक्त कुटुंब पध्दती संपुष्टात येत आहे. मात्र संयुक्त कुटुंबातील मजा वेगळीच. याशिवाय उपरोक्त अशा लहान लहान गोष्टीमधून आपण कुटुंबातील सदस्यांना आनंद देऊन स्वत:ही आनंद घेऊ शकतो. यामुळे, कौटुंबिक प्रेमाची साखळी अधिक मजबूत होण्याला मदत होते.

 

Web Title: 'He gave a unique gift to the mother!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.