रेल्वेतून व तलावात उडी घेऊनही तो बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:54 IST2021-03-04T04:54:12+5:302021-03-04T04:54:12+5:30

भद्रावती : नवी दिल्ली ते चेन्नई रेल्वेमार्गावर विजासन चौकीवर धावत्या रेल्वेगाडीतून उडी मारल्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या ...

He escaped by jumping off a train and into a lake | रेल्वेतून व तलावात उडी घेऊनही तो बचावला

रेल्वेतून व तलावात उडी घेऊनही तो बचावला

भद्रावती : नवी दिल्ली ते चेन्नई रेल्वेमार्गावर विजासन चौकीवर धावत्या रेल्वेगाडीतून उडी मारल्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या इसमाने तलावात उडी घेतली. त्यानंतरही तो सुखरूप बाहेर निघाल्याने फुकटनगर परिसरात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ही घटना मंगळवारी घडली.

दिलीप बंजारे (३५) रा. बिलासपूर छत्तीसगड असे या इसमाचे नाव आहे. हा इसम कामगार असून तो कामासाठी छत्तीसगडमधून चेन्नईकडे जात असताना धावत्या रेल्वेतून त्याने उडी घेतली व एका शेतात पडून जखमी झाला. येथील कामगारांनी त्याला ऑटोने रुग्णालयात पाठविले असता परत त्याने ऑटोतून उतरून विजासन येथील तलावात उडी घेतली. ही घटना घडताच भद्रावती पोलीस व येथील नागरिक त्या तलावात त्याचा शोध घेत होते. परंतु हा इसम तलाव पार करून बंगाली कॅम्प परिसरात नग्नावस्थेत सापडला. येथील काही नागरिकांनी कपडे परिधान करण्यासाठी दिले व पोलिसांना पाचारण केले व पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर वैद्यकीय उपचार केल्यानंतर त्याच्या परिवाराला या घटनेबाबत माहिती दिली. घडलेल्या घटनेबाबत दिलीप यास विचारणा केली असता मला काहीच माहीत नाही, असे तो सांगत आहे. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.

Web Title: He escaped by jumping off a train and into a lake