‘तो’ नागडा दुचाकीने आला, अघोरी कृत्याचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:28 IST2021-07-28T04:28:58+5:302021-07-28T04:28:58+5:30
वडसा येथील एक युवक या दिवशी दुचाकीने नग्न अवस्थेत कोकेवाडा येथे रात्री ८ वाजताच्या सुमारास आला. त्याला गावातील युवकांनी ...

‘तो’ नागडा दुचाकीने आला, अघोरी कृत्याचा प्रयत्न फसला
वडसा येथील एक युवक या दिवशी दुचाकीने नग्न अवस्थेत कोकेवाडा येथे रात्री ८ वाजताच्या सुमारास आला. त्याला गावातील युवकांनी हटकले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. एकाने त्याला घालायला कपडे दिले. परंतु त्याचा उद्देश पूर्ण व्हायचाच होता. रात्री १२ वाजता त्याने नंदकिशोर चौधरी यांच्या घरची गाय सोडली. तिच्यावर त्याने मंत्रोपचार सुरू केले. त्याच्यावर आधीच पाळत ठेवलेल्या युवकांनी त्याला पकडून, विचारपूस करून चौकशी केली. त्याने सोबत आणलेल्या दुचाकीमध्ये मंत्रोपचार लिहिलेली अनेक कागदपत्रे दिसली. ती पाहिली असता तिथे गायीवर कशा पद्धतीने मंत्रोपचार करायचे लिहिलेले होते. उपस्थित युवकांनी चांगलेच बदडून सकाळी तंटामुक्ती समोर हजर केले. त्याने चौकशीला प्रतिसाद न दिल्याने पोलिसांना बोलावून चौकशी केली. पुढील तपास सुरू आहे.