बल्लारपुरात हजरत बाबा ताजुद्दीन जन्मोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:36 IST2021-02-05T07:36:39+5:302021-02-05T07:36:39+5:30

भाविकांना महाप्रसाद वितरण बल्लारपूर : शहरातील विविध ठिकाणी हजरत बाबा ताजुद्दीन यांचा १५९ वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात ...

Hazrat Baba Tajuddin Janmotsav in Ballarpur | बल्लारपुरात हजरत बाबा ताजुद्दीन जन्मोत्सव

बल्लारपुरात हजरत बाबा ताजुद्दीन जन्मोत्सव

भाविकांना महाप्रसाद वितरण

बल्लारपूर : शहरातील विविध ठिकाणी हजरत बाबा ताजुद्दीन यांचा १५९ वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने साईबाबा वॉर्डातील आयोजक हजरत बाबा जलाल (र.तू ) दरबारतर्फे केक आणि महाप्रसाद वितरण कार्यक्रम घेण्यात आला.

यासोबतच सरकारी दवाखान्यात फळ वितरण करण्यात आले. कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी कमिटीचे सोहेल शेख, करण टपाले, शेख शरीफ, राजू टपाले, नवाब शेख, कुणाल टपाले व मित्रमंडळींनी सहकार्य केले.

याशिवाय बाबा ताजुद्दीन युवक मंडळतर्फे हजरत बाबा ताजुद्दीन यांचा जन्मोत्सव नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष शेख सत्तार, अक्षय चौधरी, अरुण मडावी, शेख सलमान, श्रीकांत तुमाने, शेख इरशाद, कवडू हिकरे, विजू गुरनुले व मित्रमंडळींच्या पुढाकाराने महाप्रसाद वितरण कार्यक्रम घेण्यात आला.

Web Title: Hazrat Baba Tajuddin Janmotsav in Ballarpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.