संगणक ज्ञान असणे काळाची गरज
By Admin | Updated: August 11, 2016 00:41 IST2016-08-11T00:41:53+5:302016-08-11T00:41:53+5:30
ग्रामीण भागातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांसाठी संगणक शिक्षण घेणे ही अत्यंत कठीण बाब आहे.

संगणक ज्ञान असणे काळाची गरज
विजय वडेट्टीवार : संगणक प्रशिक्षणाचे उद्घाटन
सिंदेवाही : ग्रामीण भागातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांसाठी संगणक शिक्षण घेणे ही अत्यंत कठीण बाब आहे. आर्थिक परिस्थिती अभावी काही विद्यार्थ्यांना संगणक ज्ञान घेणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेता सामाजिक बांधीलकीच्या माध्यमातून स्वखर्चाने विद्यार्थ्यांकरिता संगणक प्रशिक्षण योजना सिंदेवाही येथे सुरू करण्यात आली. आधुनिक काळात संगणक ज्ञान असणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.
संगणक प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमात आ. विजय वडेट्टीवार बोलत होते. याप्रसंगी संगणक प्रशिक्षणार्थी तथा प्रसाद कॅम्पुटर अकाडमीच्या वतीने आ. विजय वडेट्टीवार यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष अरुण कोलते, जिल्हा महासचिव हरिभाऊ बारेकर, शहर अध्यक्ष राहुल पटेल, डॉ. माधव वरभे, सरपंच गणेश गोलपल्लीवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रांजली बन्सोड तर आभार प्रसाद कॅम्पुटर अकाडमीचे संचालक चंद्रकांत डोये यांनी मानले. यशस्वीतेसाठी मोरेश्वर ज्ञानवाडकर, अशोक सहारे, दर्शन निकोडे, प्रवीण मोगरे, विनोद लोनकर व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)