वारकरी संप्रदायाचे हरिभाऊ नाकाडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:29 IST2021-07-28T04:29:42+5:302021-07-28T04:29:42+5:30

विसापूर : येथील वारकरी संप्रदायाचे हरिभाऊ नाकाडे (७७) यांचे मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास निधन झाले. वयाच्या पस्तिशीपासून सतत ...

Haribhau Nakade of Warkari sect passed away | वारकरी संप्रदायाचे हरिभाऊ नाकाडे यांचे निधन

वारकरी संप्रदायाचे हरिभाऊ नाकाडे यांचे निधन

विसापूर : येथील वारकरी संप्रदायाचे हरिभाऊ नाकाडे (७७) यांचे मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास निधन झाले. वयाच्या पस्तिशीपासून सतत पंढरपूरला कार्तिक वारी करीत होते. आणि आषाढी गुरुपौर्णिमेला स्वखर्चाने कीर्तन व महाकाल्याचा कार्यक्रम करायचे. विठ्ठलभक्त नाकाडे यांनी वारकरी संप्रदायाची दीक्षा घेतल्यापासून कधीच मांसाहार केला नाही. साधी राहणीमान उच्च विचारसरणी, लोकोपयोगी कार्यात सक्रिय असायचे. संत परंपरेचा वारसा लाभावा म्हणून आपल्या मुलालाही आळंदीला पाठवले होते. शिवसेना विभाग प्रमुख सुभाष नाकाडे यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी सकाळी १० वाजता येथील निवासस्थानाहून निघणार आहे.

270721\197-img-20210727-wa0081.jpg

हरिभाऊ नाकाडे यांचे छायाचित्र

Web Title: Haribhau Nakade of Warkari sect passed away